शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियानाचे विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित

By admin | Updated: February 1, 2015 22:59 IST

वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१५ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना

गोंदिया : वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१५ निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. सदर कार्यक्रम वाहत्ूुक शाखा कार्यालय मनोहर चौक, गोंदिया येथे घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, प्राचार्य अंजन नायडू, प्राचार्य एन.के. बाहेकार, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ना.रा. निमजे, शहर ठाणेदार पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, रामनगरचे पोलीस निरीक्षक कबाडी, गोंदिया ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनवने, रावणवाडीचे पोलीस निरीक्षक निंबाळकर उपस्थित होते. यावेळी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात सहकार्य करणारे लॉयन्स क्लब गोंदिया, जेसीआय गोंदिया तसेच राईस सिटीचे अध्यक्ष व सभासदांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला विविध शाळा, महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस, आरएसपी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकगण, शहरातील मान्यवर, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, आॅटो व काळी-पिवळी संघटना, ट्रान्सपोर्ट संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल शहरातील जे.एम. हायस्कूल, गुरूनानक स्कूल, एस.एस. गर्ल्स कॉलेज, सरस्वती महिला विद्यालय, एन.एम.डी. कॉलेज, नुतन हायस्कूल यांना विशेष ट्रॉफी देवून गौरव करण्यात आले. त्यानंतर वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विविध शाळांतंर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धामधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात आठवी ते दहावीच्या गटामध्ये प्रथम गुरूनानक विद्यालयाचा रितेश डी. शेंडे, व्दितीय गुरूनानक हिंदी हायस्कूलचा आदित्य आशिष बागडे तर तृतीय पुरस्कार मनोहर म्युनिसिपल हायस्कूलचा विद्यार्थी मयूर सिंगणधुपे याला मिळाला. वर्ग पाचवी ते सातवीच्या गटातील चित्रकला स्पर्धेत प्रथम गुरूनानक वरिष्ठ प्राथमिक शाळेचे यश तिवारी, व्दितीय हर्शद हिरामण मंडीये व तृतीय क्रमांक गुरूनानक इंग्रजी शाळेचा विद्यार्थी अमन रामटेके याला मिळाला. तसेच उप परिवहन कार्यालयातर्फे संपूर्ण जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्राथमिक गटात देवरीच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचा मोहित वामनराव मानकर प्रथम, जि.प. उत्तर बुनियादी शाळा तिरोडाची विद्यार्थिनी ग्रेसी सुरेश डोंगरे द्वितीय तर याच बुनियादी शाळेची श्रुती बाळू पाटील या विद्यार्थिनीने तृतीय पुरस्कार मिळविला. माध्यमिक गटाच्या चित्रकला स्पर्धेत डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूलमधील वर्ग आठवीचा मोहित मदन कापसे प्रथम, देवरी येथील छत्रपती हायस्कूलच्या वर्ग आठवीचा मोहित मुनेश्वर शहारे द्वितीय तर मक्काटोला (सालेकसा) येथील पंचशील हायस्कूलमधील वर्ग नववीची विद्यार्थिनी प्रगती देवराज भांडारकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. सर्वांना बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ना.रा. निमजे यांनी करून रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत राबविलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर आभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी मानले. (प्रतिनिधी)