शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्नावस्थेत उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:36 IST

भिक मागून तर कधी झाडावर आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांनी सोमवारी (दि.१९) अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा ११ वा दिवस असूनही अद्याप त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.

ठळक मुद्देशिक्षकांच्या आंदोलनाचा ११ वा दिवस : आश्वासनांची पूर्तता होणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भिक मागून तर कधी झाडावर आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांनी सोमवारी (दि.१९) अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा ११ वा दिवस असूनही अद्याप त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.मागण्यांना घेऊन माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाच वर्षापासून खोटी आश्वासने, खोटी माहिती व भूलथापा देण्याचेच कार्य केल्याचा आरोप या शिक्षकांचा आहे. शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई येथील अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषीत केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना अघोषीत ठेवून या सर्वांची म्हणजे १४६+१६५६ शाळांच्या अनुदानाची गेल्या अधिवेशनात आर्थिक तरतूद सुद्धा केली. त्यासंबंधी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले असून आता फक्त १६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणा व त्यासंबंधी शासन निर्णय काढणे बाकी आहे.या कामासाठी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांनी विना विलंब शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय जाहीर करावा व शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत पगार जमा करुन वेतन देण्याची मागणी केली आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक कृती समितीच्यावतीने शासनस्तरावर २२१ आंदोलने करण्यात आली. आता शेवटचे २२२ वे बेमुदत शाळाबंद धरणे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरु आहे.या आंदोलनांतर्गत शिक्षकांनी भिक मांगो आंदोलन केले तर झाढांवर चढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. परिणामी सोमवारी (दि.१९) शिक्षकांनी अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून सर्वांचे लक्ष वेधले.याप्रसंगी जिल्हा कृती समितीचे प्रा.के.बी.बोरकर, प्रा.पी.पी.मेहर, व्ही.आर.पोगळे, जे.बी.पटले, ए.एन.कठाणे, आर. एस. जगणे, एस.डी. येळे, एम.टी. चौरे, एम.ए.उके, एम.एल.पटले, प्रतीक मेंढे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप