लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २७ मार्च रोजी फक्त १ रुग्ण मिळून आलेल्या गोंदिया जिल्ह्यात बघता-बघता कोरोनाने आपले पाय पसरले व परिणामी आजघडीला जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३,९२८ पर्यंत पोहचली आहे. यात सोमवारी (दि. ११) जिल्ह्यात २५३ क्रियाशील रुग्ण होते व त्यात सर्वात कमी फक्त २ सडक-अर्जुनी तालुक्यात असल्याने सडक-अर्जुनी तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच गोंदिया तालुका हॉटस्पॉट ठरला व आजही सर्वाधिक १४५ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. तर त्यानंतर आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला असून येथे ३० क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यात आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात दिसत असली तरी दररोज वाढत चाचलेल्या आकडेवारीमुळे अन्य ७ तालुक्यांत १० पेक्षा जास्त रुग्ण असून फक्त सडक-अर्जुनी तालुक्यात २ रुग्ण असून कोरोनामुक्तीकडे तालुक्याची वाटचाल दिसत आहे.
------------------------
फक्त एकच तालुका कोरोनामुक्तीकडे
८ तालुक्यांचा समावेश असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजघडीला फक्त सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वात कमी फक्त २ रुग्ण क्रियाशील असल्याची नोंद आहे. तर अन्य तालुक्यांत १० रुग्णांवर संख्या नोंद करण्यात आली आहे. यामुळे सडक-अर्जुनी तालुकाच कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहे.