शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

तलावातील अतिक्र मणांमुळे विषबाधेचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:25 IST

तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत्याने रासायनिक खतांचा वापर व किटनाशक औषधांचा मारा केला जातो.

ठळक मुद्देगंभीर प्रकार असूनही प्रशासन बेफिकीर : ४५ गांवांना होतोय पाणीपुरवठा, खत व किटकनाशकांचा प्रभाव

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : नवेगावबांध तलावाच्या बुडीत क्षेत्रात अतिक्र मण वाढले आहे. शेती काढून लोक मोठ्या प्रमाणात धानपीक घेत आहेत. रासायनिक खत व किटकनाशकांच्या होणाऱ्या फवारणीमुळे पाणी दूषित होते. याच पाण्याचा पुरवठा लोकांना होतो. या प्रकारामुळे तलावातील जैवविविधता, वन्यप्राणी व मानवी जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे.तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत्याने रासायनिक खतांचा वापर व किटनाशक औषधांचा मारा केला जातो. याची सरमिसळ तलावातील पाण्यात होते. तालुक्यातील २९ गावांच्या सात हजार लोकांना नवेगावबांध तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.तलावात अमाप पाणी असल्याने याचा प्रभाव जाणवत नाही. मात्र शेवटी आपण विषाचा घोट प्राशन करतो हे नाकारता पण येत नाही. एकट्या नवेगावबांध तलावातील अतिक्रमीत २०० एकर शेतीतून पाच हजार किग्रॅ थायमेट हे विषारी औषध दरवर्षी पाण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती जाणकारांनी दिली आहे. नेमके हेच चित्र इटियाडोह धरण बुडीत क्षेत्रातही बघावयास मिळते. या धरणातून सुमारे १६ गावातील १० हजार लोकांना पाणीपुरवठा होतो.विशेष म्हणजे, कर्मचारी मुकदर्शक बनले असून हल्ली पगारापूरती नोकरी झाली आहे. शहरी भागात राहण्याची ओढ व सोयीसुविधांच्या मोहापोटी कर्मचाऱ्यांनी आपले जीवन धकाधकीचे करून ठेवले आहे.खूप कमी कर्मचारी मुख्यालयात राहतात. परिणामी त्यांचे कर्तव्याच्या ठिकाणी दुर्लक्ष होते. याचाच गैरफायदा घेत लोकांनी अतिक्र मणाचा सपाटा लावला आहे. ज्या गावात नोकरी करतो तेथील लोकांचा विरोध नको म्हणून अतिक्र मणधारकांवर कारवाई होताना दिसत नाही. शेवटी अतिक्र मण नियमित करण्यासाठी शासनाला कायदा करावा लागतो हे वास्तव आहे. अशा कामचुकार कर्मचाºयांवर मात्र कारवाई होत नाही हे खरे दुर्दैव आहे.सारस ठरले विषाचे बळीसारस पक्ष्यांची संख्या जिल्ह्यात अत्यल्प आहे. अशीच सारसाची एक जोडी तालुक्यातील बोंडगाव-सुरबन येथील शृंगारबांध तलावात होती. पाच वर्षांपूर्वी तलावाशेजारी असलेल्या अतिक्रमित शेतजमीनीतील किटनाशक औषधयुक्त पाणी प्यायल्याने या जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ही एकमेव सारस जोडी अशा निष्प्रभ प्रशासनाची बळी ठरली. हल्ली प्रशासन अलर्ट झाले असून सारस बचावची मोहीम राबविली जात आहे. मात्र जे होते त्याचा बचाव करण्यात सपशेल अपयशी ठरले.विदेशी पक्ष्यांनाही धोकाहिवाळ््यात सातासमुद्रापार प्रवास करीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात सायबेरीयन पक्षी नवेगावबांध तलावावर येतात. आपले भक्ष्य शोधण्याच्या प्रयत्नात ते अशा शेतात जाऊन विषयुक्त पाणी प्राशन करून मृत्युमुखी पडत असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र याची माहिती केवळ त्या शेतकºयालाच होते. इतरत्र वाच्यता होत नसल्याने हा प्रकारचं उजेडात येत नाही असा सूर पक्षीप्रेमींमध्ये व्यक्त केला जात आहे.तलावांचे क्षेत्रच कमी झालेअर्जुनी-मोरगाव तालुक्याची तलावांचा तालुका अशी ओळख आहे. तालुक्यात तब्बल ३३३ तलाव आहेत. मात्र प्रत्येक तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. विविध शासकीय विभागांच्या अखत्यारीत हे तलाव असले तरी त्या यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तलावांचे क्षेत्रफळच कमी झाले आहे. तलावांच्या बुडीत क्षेत्रात आता शेती होऊ लागली आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे. याचा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांनाच फटका आहे. शिवाय अतिक्रमणाच्या वादावरून भांडणं वाढली आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या अतिक्र मणांमुळे गावागावात समस्या सुद्धा वाढणार आहेत. प्रशासनाने तलावांच्या क्षेत्राची मोजणी करून असे अतिक्र मण काढून घेणे काळाची गरज आहे.वन्यप्राणीही संकटातनवेगावबांध तलावाशेजारूनच व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. याठिकाणी वन्यजीव पाणी पिण्यासाठी येतात. विषारी व दूषित पाण्यामुळे त्यांचेवर विषबाधेचे संकट ओढवले आहे. असे प्रकार घडत असावेत मात्र ते उजेडात येत नसल्याने प्रशासनाला यातील गांभिर्य कळत नाही. वन्यजीव विभाग ‘आॅल ईज वेल’ असल्याचे भासविते. मात्र अतिक्र मण हटविण्याचे धाडस कुणीतरी दाखिवल्याचे ऐकिवात नाही. असाच प्रकार इटियाडोह व तालुक्यातील इतर तलावांतील बुडीत क्षेत्रात काढलेल्या अतिक्र मणाच्या शेतजमिनीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणEnchroachmentअतिक्रमण