लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. तर दुसरीकडे महागाईने डोकेवर काढले आहे. मागील आठवडाभरापासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गृहीणींचे बजेट बिघडले आहे.सध्या भाजीबाजारात हिरव्या पालेभाज्यांसह इतर भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्या वर आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्या बाहेर जात आहे. टोमॅटो ८० रुपये किलो असून शिमला ८० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, तोंडुळे ४०, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, फुलकोबी ८० रुपये किलो, लसन १६० रुपये किलो आहे. कुठल्याही भाजीचे दर हे ५० रूपये प्रती किलोच्यावर असल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.५०० रुपयांची नोट खर्च झाल्यावर थैलीभर भाजीपाला येत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. तर गृहिणींना महिन्याचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. लसणाचे भाव सुद्धा दर आठवड्यात वाढत आहेत. त्यामुळे भाजीला लसणाचा फोडणी देणे महाग झाले आहे. कोरोनामुळे अद्यापही उद्योग धद्यांची गाडी रुळावर आली नाही. अनेकांच्या हाताला रोजगार नाही. अशात आता वाढत्या महामाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जीवन जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.भाजीबाजारात गेल्यावर कुठल्याही भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्यावरच असल्याने भाजीपाला कसा खरेदी करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महिन्याचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. अशात घरखर्च साभाळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- उर्मिला बावनथडे (गृहीणी)हिरव्या भाजीपाल्यासह कडधान्याच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. वाढत्या महामागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.- राजेश हरिणखेडे.
वाढत्या महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST
सध्या भाजीबाजारात हिरव्या पालेभाज्यांसह इतर भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्या वर आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्या बाहेर जात आहे. टोमॅटो ८० रुपये किलो असून शिमला ८० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, तोंडुळे ४०, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, फुलकोबी ८० रुपये किलो, लसन १६० रुपये किलो आहे. कुठल्याही भाजीचे दर हे ५० रूपये प्रती किलोच्यावर असल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.
वाढत्या महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे
ठळक मुद्देगृहिणींचे बजेट बिघडले : भाजीपाल्याचे दर कडाडले