लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने जिल्ह्यातील अंतीम मतदार यादी जाहीर केली आहे. यात चारही मतदारसंघात एकूण १० लाख ९६ हजार ४४१ मतदार आहेत.सर्वाधिक ३ लाख २१ हजार २९९ मतदार हे गोंदिया विधानसभा क्षेत्रात आहेत.विधानसभा निवडणुका तोंडावर असून निवडणूक विभागाकडून येत्या आठ दहा दिवसात निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय वातावरण आता तापायला लागले आहे. तर निवडणूक विभागाने सुध्दा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत.यापैकी गोंदिया विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २१ हजार २९९ मतदार असून यामध्ये १ लाख ५७ हजार ३८९ पुरूष आणि १ लाख ६३ हजार महिला मतदार आहेत.अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५२ हजार ५०१ मतदार असून यामध्ये १ लाख २७ हजार ५९ पुरूष आणि १ लाख २५ हजार ४४४ महिला मतदार आहेत.तिरोडा विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५६ हजार ६२५ मतदार असून यात १ लाख २६ हजार ९८२ पुरूष आणि १ लाख २९ हजार ६४२ महिला मतदार आहेत. आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ६६ हजार १६ मतदार असून यामध्ये १ लाख ३३ हजार १८९ पुरूष आणि १ लाख ३२ हजार ८२७ महिला मतदार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत या चारही मतदारसंघात एकूण १० लाख ९६ हजार ४४४ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.सात हजार मतदार वाढलेनिवडणूक विभागातर्फे जुलै ते आॅगस्ट महिन्यादरम्यान विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यात ७००२ नवीन मतदारांनी नोंदणी झाली. यामध्ये २६०१ पुरूष आणि ४४०१ महिला मतदारांचा समावेश आहे.मतदार नोंदणी अभियाना दरम्यान ७ हजार नवीन मतदार वाढल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.महिला मतदारांची संख्या अधिकगोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही मतदारसंघात एकूण १० लाख ९६ हजार ४४१ मतदार आहेत. यात ५ लाख ४४ हजार ६१९ पुरूष आणि ५ लाख ५१ हजार ८२० महिला मतदार आहेत. पुरूष मतदारांच्या संख्येच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे.निवडणूक विभाग लागला कामालानिवडणूक निर्णय विभागातर्फे पुढील दोन आठवड्यात केव्हाही विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने सुध्दा मतदार याद्या प्रकाशीत करण्यास व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. निवडणूक विभाग सुध्दा कामाला लागल्याचे चित्र आहे.
१० लाख ९६ हजार मतदार बजाविणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST
विधानसभा निवडणुका तोंडावर असून निवडणूक विभागाकडून येत्या आठ दहा दिवसात निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय वातावरण आता तापायला लागले आहे. तर निवडणूक विभागाने सुध्दा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
१० लाख ९६ हजार मतदार बजाविणार मतदानाचा हक्क
ठळक मुद्देवेध विधानसभा निवडणुकीचे : गोंदिया विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदार