शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

३० एकरातील धानपिक संकटात

By admin | Updated: April 23, 2016 01:44 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावापैकी एक पानगावचा तलाव यंदा एप्रिल महिन्यातच कोरडा पडला.

पानगावच्या तलावात ठणठणाट : संपूर्ण पाणी आटल्याने उन्हाळी पिकांना फटकासालेकसा : तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावापैकी एक पानगावचा तलाव यंदा एप्रिल महिन्यातच कोरडा पडला. या तलावाच्या पाण्याच्या भरवसावर लावलेले ३० एकरांतील धानपिक संकटात आले आहे. तलाव आटल्याने गौरीटोला पानगावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.जवळपास १०० एकरांत पावसाच्या खरीप पिकासाठी वेळोवेळी वरदान ठरणारा तसेच ६० एकर क्षेत्रात उन्हाळी पिकासाठी पाण्याची पूर्तता करणारा पानगाव येथील मोठा तलावात यंदा पूर्ण ठणठणाट झाल्याने एप्रिल महिन्यातच लक्षात आले. या तलावाच्या पाण्याने दरवर्षी ४०-५० एकरातील पीक काढण्यासाठी येथील पाणी शेवटपर्यंत पुरते. तसेच कपडे धुणे, जनावरे धुणे, गाई, म्हशी, बैलांना पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना वाहनाना विविध कामासाठी या तलावाच्या पाणी वापरता येते. दरवर्षी या तलावात पाणी राहात होते. वर्षभर विविध कामासाठी पाण्याचा उपयोग करून ही या तलावात जलसाठा पावसाळा लागेपर्यंत राहात होता. परंतु यंदा या तलावाची अशी दुर्दशा बघून सगळेच अवाक झाले आहेत. हा तलाव राज्यमार्ग २४९ आमगाव-सालेकसा-डोंगरगड मार्गावर रस्त्यालगत आहे. या तलावात पाणी साठा याचा जवळून प्रवास करणे आनंददायी वाटत असते. परंतु या अनेक वर्षानंतर या तलावाचे सौंदर्य व वैभव नष्ट झाले आहे. यंदा तलावाच्या जवळून प्रवास करताना नैराश्य पूर्ण अनुभव येत आहे. या तलावातून निघणारा कालवा हा संपूर्ण पानगाव परिसराला गौरी आणि बच्चनटोला परिसराला पाणी पुरवठा होत असून वर्षभर या कालव्याचे पाणी विविध उपयोगासाठी वापरणे महिलांना सोयीस्कर ठरत होते. परंतु आता पाण्याअभावीे मोठा त्रास होत आहे. सर्वात मोठे संकट म्हणजे या तलावाच्या भरवश्यावर लावलेले धानपीक संकटात सापडले आहे. धान पिकाला गळा दाबण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. येथील जलसाठा अल्प असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी धानपीक घ्यायचे नव्हते. परंतु शेतकऱ्यांनी परिस्थिती न समजून घेता चूक केली याचा फटका त्यांना बसत आहे.(तालुका प्रतिनिधी)