शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

मुदत संपल्यानंतरही तांदळाची आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

येथे वखार महामंडळाचे ७ हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे. मात्र, काही नजीकच्या राईस मिलर्सला खासगी गोदाम देण्यात आले. यावर देखरेख ठेवण्यासाठी नवेगावबांध येथील गोदामपालाची नियुक्ती करण्यात आली आहे. हाच गोदामपाल नवेगावबांध येथील गोदामसुद्धा सांभाळतो. अर्जुनीचा गोदामपाल नवेगावबांधचे सीआरएम गोदाम सांभाळतो. एकाच गोदामपालाला दोन वेगवेगळ्या ठिकाणचे गोदाम सांभाळणे कसे काय शक्य आहे? असे आदेश करण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हेतू स्पष्ट होत नाही.

संतोष बुकावनलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव :  सीएमआर तांदळाच्या अलॉटमेंटची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपल्यानंतरही आवक सुरूच आहे. काही राईस मिल मालकांकडून अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून सर्रास हा गोरखधंदा सुरूच आहे. याद्वारे कोट्यवधींची नियमबाह्य उलाढाल प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू आहे. तरीही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी मौन धारण करून आहेत. गोरगरिबांच्या घासावर डल्ला मारण्याचे धनदांडगे व अधिकाऱ्यांचे कृत्य थांबणार का? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.  येथे वखार महामंडळाचे ७ हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे. मात्र, काही नजीकच्या राईस मिलर्सला खासगी गोदाम देण्यात आले. यावर देखरेख ठेवण्यासाठी नवेगावबांध येथील गोदामपालाची नियुक्ती करण्यात आली आहे. हाच गोदामपाल नवेगावबांध येथील गोदामसुद्धा सांभाळतो. अर्जुनीचा गोदामपाल नवेगावबांधचे सीआरएम गोदाम सांभाळतो. एकाच गोदामपालाला दोन वेगवेगळ्या ठिकाणचे गोदाम सांभाळणे कसे काय शक्य आहे? असे आदेश करण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हेतू स्पष्ट होत नाही. गोदामाची अत्यल्प क्षमता असताना त्यात दैनंदिन दुप्पट तांदूळ स्वीकृत केला जात आहे. नवेगावबांध येथे सीएमआरकरिता तांदळाचे गोदाम असतानाही केवळ दोनच राईस मिलधारकांना खासगी गोदामात तांदूळ टाकण्याची परवानगी देण्यात  आली आहे.  यामुळे शासनाचे वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तांदळाचे अलॉटमेंट ३० सप्टेंबरलाच संपले असून अद्याप वाढीव मुदत मिळाली नसतानाही ११ ऑक्टोबरपर्यंत तांदूळ स्वीकृत करणे सुरूच आहे. ११ ऑक्टोबर रोजी किसन अग्रवाल यांनी किशोर शहारे यांच्या भाड्याने घेतलेल्या गोदामात एका ट्रकमधील अर्धा तांदूळ रिकामा करण्यात आला. कुणीतरी आल्याची चाहूल होताच सर्व पळून गेल्याचा प्रकार बघावयास मिळाला. ट्रॅक्टरद्वारे आलेला तांदूळ गोदामात टाकण्यास स्पष्ट मनाई असतानाही गोदामस्थळी तांदूळ भरलेले अनेक ट्रॅक्टर उभे होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची चक्क पायमल्ली केली जात असल्याचे दिसून आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे, नियुक्त असलेले गोदामपाल माहुरे हे यावेळी हजर नव्हते. या गोदामाची तत्काळ चौकशी करून अतिरिक्त असलेल्या तांदळाचा पंचनामा करण्याची मागणी केली जात असल्याची बोलले जाते.

कसा चालतो हा गेम 

- राईस मिल मालकांना शासन आधारभूत हमी भावाने खरेदी केलेला धान भरडाईसाठी देतो. मात्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश व राज्याच्या इतर जिल्ह्यांतील स्वस्त अथवा राशन दुकानातील तांदूळ विकत घेऊन भरडाई केल्याचा भास निर्माण केला जातो. मोबदल्यात स्वस्त दराचा निकृष्ट तांदूळ गोदामात कोंबला जातो. हाच तांदूळ गोरगरिबांना राशन दुकानातून दिला जातो. या प्रक्रियेत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यात अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो. भरडाई काळातील राईस मिलच्या वीज देयकांची तपासणी केल्यास हे मोठे रॅकेट उजेडात येऊ शकते. - १ क्विंटल धान भरडाईसाठी साधारणपणे ०.८० युनिट वीज जळणे अपेक्षित असते. याप्रमाणे तपासणी केल्यास बिंग फुटू शकते. पण मांजराच्या गळ्याला घंटी कोण बांधणार? हा प्रश्न निर्माण होतो. गोदामात सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे; पण येथे काळे धंदे होत असल्याने सीसीटीव्हीच उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. पुरवठा निरीक्षक काळे हे ९ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष आले नसतानाही गोदामातील तांदळाची गुणवत्ता तपासणी झालीच कशी? तांदळाच्या १५ लॉटवर स्वाक्षरी करून तांदूळ स्वीकृत केल्याची तक्रार काही राईस मिल मालकांनी केली आहे. यासंदर्भात सदर प्रतिनिधीने  सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास टाळले.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना