शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
4
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
5
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
6
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
7
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
9
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
10
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
11
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
12
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
13
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
14
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
15
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
18
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
19
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
20
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?

क्रांतीची मशाल राणी अवंतीबाई लोधी

By admin | Updated: March 20, 2015 00:55 IST

सन १८५७ मध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात काही क्रांतीविरांनी इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी एल्गार पुकारला.

विजय मानकर/राजकुमार बसोने सालेकसासन १८५७ मध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात काही क्रांतीविरांनी इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी एल्गार पुकारला. यामध्ये एक क्रांतीची मशाल होती ती म्हणजे रामगढ येथील राणी अवंतीबाई लोथी. विरांगणा अवंतीबाईने इंग्रजांशी केलेले युद्ध देशवासियांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करीत आहे.विलक्षण बुद्धीमत्ता, अविस्मरणीय शौर्य, पराक्रम आणि कर्मठ व्यक्तिमत्वाच्या प्रतिक अवंतीबाई लोधी यांचा जन्म १६ आॅगस्ट १८३१ मध्ये मध्यप्रदेशच्या शिवनी जिल्ह्यातील मनकोहळी या गावी राव जुझांरुसिंह आणि सुमित्रा या दाम्पत्याच्या घरी झाला. बालपणापासूनच अश्वारोहण, तलवार चालविणे, धनुष्यबाणाने नेहमी लक्ष्य भेदने या कामात विशेष रस घेत सैनिकी शिक्षण घेण्याकडेही त्यांचा कल राहिला. १७ वर्षाच्या वयातच प्रौढ वयाचे रामगड येथील राजा विक्रमजितसिंह यांच्याशी त्यांचा विवाह करण्यात आला. या काळात इंग्रजांनी देशातील अनेक प्रांतावर आपली सत्ता स्थापित केली होती. पुढचे लक्ष्य त्यांनी रामगडला बनविले होते. यासाठी त्यांनी आपला डाव खेळीत राजा विक्रमजितसिंह याला वेडा घोषित केले आणि रामगड येथे कोर्ट आॅफ रेजीमेंट कायम करुन इंग्रजी कंपनीची एक रेजीमेंंट ठेवू लागले. परंतु अवंतीबाईने सत्तेची सुत्रे आपल्या हाती घेत रामगडचे शासन यशस्वीरित्या चालवू लागल्या. त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. १८५७ मध्ये मे महिन्यात राजा विक्रमजितसिंह यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांनी इंग्रजांना रामगडच नाही तर संपूर्ण देशातून हद्द पार करण्याचा संकल्प केला व त्या दिशेने पाऊल टाकने सुरु केले. राणीने मध्य भारतातील विविध प्रांताचे राजे, सरंजाम, जहागिरदार, रियासतदार यांच्याकडे आपले दूत पाठविले व इंग्रजांविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले.इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी नव्या दमाने मैदानात या नाहीतर बांगड्या घालून घरी बसून रहा, असे संदेश त्यांनी पाठविले. ते वाचून अनेकांचे रक्त खळवळले. शंकरशाह आणि रघुनाथसिंह या संगीतकारांनी आपल्या संगीताच्या व कवी संमेलनाच्या माध्यमातून राणीचे संदेश गावागावात पोहचविण्याचे काम सुरू केले, परंतु इंग्रजांच्या गुप्तचरांना याची खबर मिळताच त्या दोघांना गोळ्या घालून यमसदनी पाठविले. यामुळे राणी क्रोधीत झाल्या, त्यांनी मंडला येथील डेप्युटी कमिश्नर वाडिंगटन यांच्या मुख्यालयावर हल्ला चढविला. वाडिंगटनला मृत्यूच्या घशात जाताना पाहून त्यांनी हिंदुस्तानी सैनिकांकडे जीवनदान मागीतले. त्यावर राणीने त्यांना अभयदान दिले. परंतु हेच अभयदान राणीला महागात पडले. काही दिवसातच वाडिंगटन यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी सैनिकांसह रामगडवर हल्ला केला. शेवटी इंग्रजी सेना आणि राणी अवंतीबाई यांच्यात युद्धाची सुरवात झाली. पण राणी त्यांच्या हाती येत नव्हती. शेवटी अवंतीबाईच्या मंत्र्यांनी गद्दारी करीत इंग्रजांना गुप्त माहिती दिली व राणीला इंग्रजांनी चारही बाजूने घेरुन टाकले. शेवटी मृत्यू समोर बघून त्यांनी आपले सेनापती उमरावसिंह यांची तलवार मागून स्वत:च्या हाताने इहलोकाची यात्रा संपविली. शेवटी वाडिंगटननेही राणीच्या विरगतीला सलाम केला. तो दिवस होता २० मार्च १८५७. राणी अवंतीबाई अखेरचा श्वास घेत इंग्रजांना म्हणाल्या, या क्रांतीची मी एकटी जवाबदार असून राज्याच्या जनतेला व सैनिकांना व इतर जागिरदारांना दंड देवू नये, असे म्हणत त्या चिरनिद्रेत गेल्या. अशा विरांगणेचे कार्य सतत प्रेरणा देत राहणार.