शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्राधान्यक्रमात सुधारणा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 15:15 IST

अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी : चूक शासनाची, आक्रोश सरपंचांवर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ उद्दिष्ट वितरणात घर पडलेल्या, घर जीर्ण झालेल्या, अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त अति गरजू लाभार्थ्यांना तातडीने घरकुल देण्यासाठी प्राधान्य क्रमात सुधारणा करण्यात यावी, तसे अधिकार ग्रामसभेला देण्यात यावेत अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात गरजूंना प्राधान्यक्रम न देता सिस्टीमद्वारे ऑटो जनरेट नावे टार्गेट यादीत आणली जात असून सॉफ्टवेअरचे नाव पुढे करण्यात येत आहे. यामुळे गरजू लोक वंचित राहत आहेत. आपले नाव आताच्या यादीत का नाही यासाठी लाभार्थी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करीत आहेत. शासनाची चूक असताना सरपंच, पदाधिकारी यांनी रोष का सहन करावा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदियाचे प्रकल्प संचालक यांनी आपल्या स्तरावरून या योजनेत सुधारणा कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत प्राधान्यक्रमाने लावून दिलेली घरकुल लाभार्थ्यांची यादी आणि मंजूर झालेली लाभार्थ्यांची यादी यांच्यात तफावत आहे. त्यामुळे ग्रामसभेला अधिकार नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामसभेनुसार मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला प्राधान्यक्रम देऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

"ग्रामसभा ही सर्वोच्च आहे. ग्रामसभेच्या निर्णयाला शासन, प्रशासनाने मान्य केलेच पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेत अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त, अति गरजू, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा. याची निवड करण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात यावे. जेणेकरून वंचित राहिलेल्या अति गरजू लाभार्थ्यांचा रोष ग्रामपंचायत व सरपंचांवर राहणार नाही." - चंद्रकुमार बहेकार, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद, गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदिया