शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

जिल्ह्यातील वाळू माफियांविरुद्ध महसूल विभाग आक्रमक

By admin | Updated: September 23, 2015 05:30 IST

जिल्ह्यात यावर्षी वाळू माफियांना अवैधपणे रेतीचा उपसा करणे चांगलेच महागात पडत आहे. अनेक गब्बर

 गोंदिया : जिल्ह्यात यावर्षी वाळू माफियांना अवैधपणे रेतीचा उपसा करणे चांगलेच महागात पडत आहे. अनेक गब्बर माफियांवर महसूल विभागाने बेधडक कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला आहे. कधी नव्हे अशी कारवाई यावर्षी पहिल्यांदाच होत असल्याने वाळू माफिया चांगलेच जेरीस आले आहेत. मात्र यामुळे शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत आहे.जिल्ह्यात यावर्षी ३१ रेतीघाटांचा लिलाव झाला. त्याद्वारे शासनाला ५ कोटी २ लाख रुपयांचा महसूल मिळाला. मात्र त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रुपयांचा दंड रेती उपसा करणाऱ्या माफियांना आकारण्यात आला आहे.खनिकर्म विभागाच्या उपसंचालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत काही घाटांची तपासणी केली. त्यात काही कंत्राटदारांनी लिलावात जितके क्षेत्र रेती उपशाकरिता मंजूर होते त्यापेक्षा कितीतरी जास्त रेतीचा उपसा केल्याचे दिसून आले. त्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मोहम्मद असमल मजित गोंडिल या लिलावधारकाला अर्जुनी (ता.तिरोडा) येथील घाटासाठी ८८ लाख ६१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच घाटकुरोडा-२ या घाटासाठी ५ कोटी ५३ लाख ९६ हजार ५३८ रुपये, सरफराज अमित गोंडील यांना महालगाव (ता.गोंदिया) येथील घाटासाठी ३ कोटी ३८ लाख ३० हजार ७२३ रुपयांचा तर मंगलमूर्ती ट्रेडर्स यांना घाटकुरोडा-२ या घाटासाठी ३ कोटी ६६ लाख १३ हजार १०३ रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड अद्याप त्यांनी भरला नसल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी बोमीडवार यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)तिरोड्यात ५० लाखांचा महसूल तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांनी रेती माफियांविरूद्ध उघडलेल्या मोहिमेत अवैधपणे रेतीचा उपसा करून त्याचा साठा करणाऱ्यांची रेती जप्त केली. त्या रेतीचा लिलाव करण्याची कारवाई सुरू आहे. कवलेवाडा घाटावरून जप्त ५०० ब्रास रेती ४ लाख ५१,५०० रुपयांत लिलावात गेली. घाटकुरोडा क्र.२ मधून जप्त १५०० ब्रास रेती १३ लाख ५० हजारात लिलावात गेली. याशिवाय अर्जुनी घाटावरून १०० ब्रास, बिरसी मलपुरी घाटावरील ४० ब्रास तर बोंडरानी घाटावरून जप्त ३०० ब्रास रेतीचा लिलाव होणे बाकी आहे. या सर्व रकमेतून ५० लाखांचा महसूल विभागाला मिळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्या रेतीमधून जवळपास १००० ब्रास रेती चोरीला गेली. ती चोरीही एसडिओ महिरे यांनी पकडून ट्रक व जेसीबी जप्त केले.