गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यात ४० हजार हेक्टरवर क्षेत्रात हलक्या धानाची लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा कापणी केलेल्या हलक्या धानाला फटका बसला. जवळपास ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे.जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्यामुळे जड धान निघण्यास अजून दोन दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र हलके धान निघाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली असून काहीणी मळणी सुध्दा सुरू केली आहे. मात्र मागील आठवड्यात सलग तीन चार दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने आणि बांध्यामध्ये पाणी साचल्याने धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस आणि वाऱ्यामुळे हजारो हेक्टरमधील धान झोपल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर केलेले काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन घेतलेल्या पिकावर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा चिंतेचे ढग निमार्ण झाले आहे.कर्जाची परतफेड कशी करणारमाझी पाच एकर शेती असून खरीपात त्यात धानाची लागवड केली होती. यासाठी जवळपास ६५ हजार रुपयांचा लागवड खर्च आला. शेतीसाठी यंदा ५० हजार रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेतून घेतले. मात्र आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले.त्यामुळे लागवड खर्च भरुन निघणे कठीण असून कर्जाची परतफेड कशी करणार असे निहारीलाल दमाहे म्हणाले.
परतीच्या पावसाने फेरले शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST
जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्यामुळे जड धान निघण्यास अजून दोन दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र हलके धान निघाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली असून काहीणी मळणी सुध्दा सुरू केली आहे.
परतीच्या पावसाने फेरले शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी
ठळक मुद्देलागवड खर्च कसा निघणार : शेतकऱ्यांवर आली कर्जबाजारी होण्याची वेळ