शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

एच.आर.ठाकरे असे त्या सेवानिवृत्त वन कर्मचाºयाचे नाव आहे. ठाकरे हे वन विभागात काम करीत असल्याने पर्यावरण संवर्धनाबद्दल सुरूवातीपासूनच रुची होती. दोन वर्षांपूर्वीच ते वन विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बराच वेळ त्यांच्याकडे असल्याने त्यांनी या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल जनजागृती करण्याचा संकल्प केला. यानंतर त्या दिशेने कार्य सुरू केले.

ठळक मुद्देदुचाकीवरुन जनजागृती, पक्ष्यांसाठी पाणपोई, दोन वर्षांपासून उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पशु पक्ष्यांचे मानवी जीवनात विशेष महत्त्व आहे. तंत्रज्ञानाचा शोध लागण्यापूर्वी ऋतुंची चाहुल आणि वातावरणातील बदलांचा अंदाज हा पक्ष्यांच्या हालचालींवरुन लावला जात होता. जंगलांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि सिंमेटच्या वाढत्या उंच इमारतींमुळे शहरांमधील झाडांचे प्रमाण कमी झाल्याने पक्ष्यांची किलबिलाट सुध्दा नाहीशी झाली.मात्र ही किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळायला हवी, पक्ष्यांचे संवर्धन व्हायला हवे यासाठी गोरेगाव तालुक्यातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मागील दोन वर्षांपासून धडपड सुरू आहे.एच.आर.ठाकरे असे त्या सेवानिवृत्त वन कर्मचाºयाचे नाव आहे. ठाकरे हे वन विभागात काम करीत असल्याने पर्यावरण संवर्धनाबद्दल सुरूवातीपासूनच रुची होती. दोन वर्षांपूर्वीच ते वन विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बराच वेळ त्यांच्याकडे असल्याने त्यांनी या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल जनजागृती करण्याचा संकल्प केला. यानंतर त्या दिशेने कार्य सुरू केले. वातावरणातील बदलांचा आणि वाढत्या तापमानाचा फटका तसेच शहरांमध्ये वाढत चालली मोबाईल टॉवरची संख्या यामुळे चिमणी, कावडा, घार, गिधाड यासह अनेक पक्षी लुप्त होत चालले आहे. पूर्वी पहाटेच्या सुमारास ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिलाट आता ऐकायला येत नाही. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती या नष्ट होत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या पिढीला या पक्ष्यांची केवळ चित्रच पाहयला मिळतील. त्यामुळे पक्ष्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. नेमका हाच संदेश ठाकरे हे नागरिकांना देत आहेत.ते जिथे जातील तिथे पक्ष्यांचे संवर्धन आणि पक्ष्यांसाठी आपल्या घरासमोर एका पात्रात पाणी ठेवण्याचा संदेश देतात. त्यांनी त्यांच्या दुचाकीला सुध्दा पक्ष्यांसदर्भात जनजागृती करणारे फलक लावले आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कुठल्या उपाययोजना कराव्यात आणि काय काळजी घ्यावी याविषयी ते जनजागृती करीत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून याबद्दल ते जनजागृती करीत आहे.पर्यावरण संवर्धनाची मला सुरूवातीपासूनच आवड होती. त्यातच सेवानिवृत्त झाल्यानंतर कसलेही काम नसल्याने पर्यावरण आणि पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. मागील दोन वर्षांपासून हे कार्य करीत आहे.- एच.आर.ठाकरे,सेवानिवृत्त वन कर्मचारी.पक्ष्यांसाठी सुरू करा पाणपोईउन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो.त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी प्रत्येकांनी आपल्या घराच्या बाहेर, झाडावर एका पात्रात पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. मानवाप्रमाणेच पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्याचा सल्ला ते नागरिकांना देत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणsocial workerसमाजसेवक