अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल लाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य अशोक हलमारे, विजय गोंडाणे, चरण चेटुले, मधुकर देशमुख, विठ्ठल तुमसरे, उद्धव भांडारकर, प्रकाश बोरकर, शिशुपाल नागलवाडे, खुशाल नाकाडे, सुखदास रहांगडाले, एस.बी.दहिवले आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या छायाचित्राचे पूजन करुन दीप प्रज्ज्वलित करण्यात आले. त्यानंतर एसएससी आणि एचएससी परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच संस्थेतील सेवानिवृत्त सदस्य कर्मचारी पी.एस.बोरकर, एस.बी.रहांगडाले, चरण चेटुले, खुशाल नाकाडे, शिशुपाल नागलवाडे, मधुकर देशमुख, विठ्ठल तुमसरे, विजय गोंडाणे, उद्धव भांडारकर, एस.व्ही.दहिवले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संचालन करून प्रास्ताविक संस्थेचे सचिव हिवराज साखरे यांनी मांडले. आभार रजनी झोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळातील दिलीप हलमारे, अरुण सोयाम यांच्यासह सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
नवोदय कर्मचारी पतसंस्थेतील सेवानिवृत्त सदस्यांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST