शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
3
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
4
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
5
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
6
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
7
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
8
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
9
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
10
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
11
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
12
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
13
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
14
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
15
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
16
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
17
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
18
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
19
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
20
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:15 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के एवढा लागलेला आहे. तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील १५३६ विद्यार्थी १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत बसले होते.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे घवघवीत यश : १९ महाविद्यालयांतील १३९५ विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के एवढा लागलेला आहे. तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील १५३६ विद्यार्थी १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी एकूण १३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यापैकी गुणवत्ता श्रेणीत ३६ प्रथम श्रेणीत ६६१, द्वितीय श्रेणीत ६७४ तर उत्तीर्ण श्रेणीत २४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.येथील सालेकसा ज्युनिअर कॉलेज मधील १७६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५ टक्के लागला. कावराबांध येथील जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज मधील ३८ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.४७ टक्के निकाल लागला. तिरखेडी येथील ग्राम विकास कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.९१ टक्के निकाल लागला असून येथील ४८ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. झालीया येथील गवराबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून येथील २४ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला विभागातून ६४ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७३.४३ टक्के निकाल लागला आहे. सोनपुरी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील ८७ पैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९४.२५ टक्के निकाल लागला आहे. शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळाचा विज्ञान आणि कला दोन्ही शाखांचा १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत १३ पैकी १३ तर कला शाखेत ३६ पैकी सर्व ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मक्काटोला येथील पंचशील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ९५ टक्के लागला. विज्ञान शाखेतील ७० पैकी ७० तर कला शाखेतील ६३ पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आमगाव खुर्द येथील श्रीनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील ३४ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७९.४१ टक्के निकाल लागला आहे. पिपरीया येथील श्यामसुंदर बोरकर वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.५६ टक्के निकाल लागला असून येथील ४१ पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बिजेपार येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विज्ञान शाखेतून ३८ पैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेतून ३५ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९७.३६ टक्के तर कला शाखेचा ८२.८५ टक्के निकाल लागला आहे. कोटजमूरा येथील शहीद अवंती कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत ७८ पैकी ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेत २० पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथील शंकरलाल अग्रवाल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२२ पैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९२.६२ टक्के निकाल लागला.कावराबांध येथील लालसिंग मच्छिरके विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील ९८ पैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९८.९७ टक्के लागला. लोहारा येथील नारायणभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.१५ टक्के लागला असून येथील ५२ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरेकसा येथील श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.२६ टक्के निकाल लागला असून येथील ७३ पैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाकानिंबा येथील राणी अवंतीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील ५८ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५.८६ टक्के लागला. कवराबांध येथील जी.के.विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १०६ पैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९६.२२ टक्के लागला. तर येथील एसआरबी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील ३७ पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेत १२ पैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९७.२९ टक्के तर कला शाखेचा ४१.६६ टक्के निकाल लागला आहे.मौखिक परीक्षा होणार बंदमौखिक परीक्षा कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्याना मौखिक परीक्षेत भरभरुन गुण देण्यात आले. त्यामुळे निकालाची टक्केवारी ९० वर गेली. मात्र पुढील सत्रापासून मौखिक परीक्षा बंद होणार असून टक्केवारी अशीच वाढलेली राहील का याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. मौखिक परीक्षा कायम राहावी अशी इच्छा सुद्धा काही पालक वर्ग व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण