शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

नागरिकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:37 IST

नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करा. बदलत्या वेळेनुसार अधिकाºयांनी आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : रावणवाडीच्या जनता दरबारात अधिकाºयांना दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करा. बदलत्या वेळेनुसार अधिकाºयांनी आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी. सामान्य नागरिकांच्या लहान-मोठ्या तक्रारींसाठी त्यांना त्रास न देता, त्या समस्या समजून घेत कायमस्वरूपी सोडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.आ. अग्रवाल यांनी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रावणवाडी येथे जनता दरबार घेतला. यात त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या वेळी संबंधित अधिकाºयांना कार्यवाहीचे निर्देश देताना ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे आदी उपस्थित होते.आ. अग्रवाल पुढे म्हणाले, शौचालय किंवा घरकुलांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करणे, सातबारामध्ये असलेल्या चुकांची दुरूस्तीची समस्या व इतर समस्या जर स्थानिक स्तरावर ठिक केल्या जात नाही. अशा तक्रारी जनता दरबारापर्यंत पोहोचल्या तर ही गंभीर व खेदजनक बाब आहे. आज भाजप सरकार बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवत आहे. मात्र मोगर्रा गावात लाईनमनच्या नोकरीसाठी सर्वाधिक गुण मिळविणारा बेरोजगार राहत असेल व कमी गुण मिळविणाºयाला ग्रामसेवकाच्या संगनमताने नियुक्ती मिळत असेल तर यात विकासाचे आमचे सर्व उद्देश्य दिशाहिन होवून जातात.जोपर्यंत देशातील सामान्य नागरिक मूलभूत गरजांसाठीसुद्धा संघर्षरत राहील, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे आधुनिक युगात अधिकाºयांनीसुद्धा आपल्या कार्यप्रणालीत सुधार करावे, असे निर्देश आ. अग्रवाल यांनी जनता दरबारात दिले.त्यातच विद्युत कंपनीला कृषी पंपांना प्राधान्याने विद्युत व्यावस्था उपलब्ध करविण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाºयांना दिले. अधिकाºयांनी सामान्य नागरिकांच्या सेवेला आपले प्रथम प्राधान्य द्यावे व शासन सामान्य नागरिकांच्या सेवेसाठीच आहे हे लक्षात ठेवावे, असा इशारासुद्धा त्यांनी अधिकाºयांना दिला.याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प. सदस्य विजय लोणारे, पं.स. सदस्य प्रकाश डहाट, पं.स. सदस्य प्रमिला करचाल, पं.स. सदस्य चमन बिसेन, जिल्हा काँग्रेस सचिव गेंदला शरणागत, मनिष मेश्राम, संतोषसिंह घरसेले, सत्यम बहेकार, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक आनंद तुरकर, आशीष चव्हाण, पं.स. सदस्य अनिल मते, वाय.पी. रहांगडाले, रमेश लिल्हारे, देवेंद्र मानकर, लोकचंद दांदरे, श्याम कावरे, जिरूटोलाचे सरपंच रामलाल उके, कासाचे सरपंच मोहपत खरे, काटीचे सरपंच अमृत तुरकर, महेश साऊसकर, प्रकाश जमरे, सचिन डोंगरे, हरी पटले, सतोनाचे सरपंच सुकराम मानकर, रवी गजभिये, जिनेश तुरकर, रामभगत पाचे, जाकीर हुसेन, केशवराव वाहने, रामदास मरठे, पवन तेलासे, राजेश मानले, हेमराज देशकर, आमेश पाचे, सचिन रहांगडाले, कैलाश देवाधारी, बिसराम कावरे, जमरूलाल बोपचे, माणिकचंद रहांगडाले, शिव तुरकर, प्रभाकर देवांगण आदी उपस्थित होते.