शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

आमगावचे रेणुकानगर चार महिन्यांपासून पाण्यात

By admin | Updated: May 2, 2015 01:41 IST

पाणी हे जीवन असते. त्याला विनाशापासून वाचवा, या पाटबंधारे विभागाच्या ब्रिदला तिलांजली देण्याचे काम आमगावचा पाटबंधारे विभाग करीत आहे.

आमगाव : पाणी हे जीवन असते. त्याला विनाशापासून वाचवा, या पाटबंधारे विभागाच्या ब्रिदला तिलांजली देण्याचे काम आमगावचा पाटबंधारे विभाग करीत आहे. मागील चार महिन्यापासून रबि पिकासाठी दिले जाणारे पाणी शेतीला मिळत नाही. उलट ते पाणी आमगावच्या रेणुकानगर, राजाभोज नगर व न्यायालयाच्या मागील भागात मागील चार महिन्यापासून वाहात आहे.रबी पिकासाठी पाटबंधारे विभागाने मागील चार महिन्यापासून पाणी वाहात आहे. मागील चार महिन्यात कितीतरी पाणी वाहून गेले. या पाण्यामुळे या परिसरात घर बांधणाऱ्या लोकांचे सिमेंट खराब झाले. विहीरीतील पाणी खराब झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमगावच्या न्यायालयामागील भाग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहात आहे. रेणुकानगरातील लोकांना रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. या नगरातील रस्ते कच्चे असल्यामुळे उन्हाळ्यातही गुडघाभर पाण्यातून तेथील लोकांना ये-जा करावी लागते. मागील चार महिन्यापासून वाया जाणाऱ्या पाण्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाचे कालवे अनेक ठिकाणातून भग्न असल्यामुळे कालव्यातील पाणी शेतीला न मिळता सरळ लोकवस्तीतून वाहात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लोकांना चिखलातून ये-जा करावी लागते. त्रस्त झालेल्या लोकांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा म्हणून लोकांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले. तेथील शाखा अभियंता एफ.पी. राठोड यांना या वाहत्या पाण्याची माहिती दिल्यावर राठोड यांनी त्या नागरिकांश्ी अरेरावी करून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा आम्ही काय करणार असा उलट प्रश्न नागरिकांना केला. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पाटबंधारे विभागाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. मागील चार महिन्यापासून पाटबंधारे विभागाच्या उदासिनतेमुळे लाखो रूपयाचे पाणी वाहून गेले आहे. शाखा अभियंत्यांना सांगूनही त्यांनी या प्रकराकडे लक्ष दिले नाही. परिणामी चार महिन्यापासून राजाभोज कॉलनी व रेणुका नगरातील लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाया गेलेल्या पाण्याचा भूर्दंड राठोड यांच्या खिशातून वसूल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बोरसरे, डॉ. पाथोडे, जांभूळकर, रामटेके, मेश्राम, लांजेवार व नागवंशी यांनी केली आहे.