शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांना मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:59 IST

Gondia : केव्हा प्रति अर्ज ५० रुपये प्रमाणे मिळणार होते पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मुख्यमंत्री माझी लाडकी : बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये देऊ, असा शासन निर्णय ही योजना सुरू झाली तेव्हा घेण्यात आला होता. लाडक्या बहिणींना चक्क पाच हप्ते देखील मिळाले. मात्र, ज्यांच्यामुळे लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल झाले, त्या अंगणवाडी सेविकांना मात्र अद्यापही त्यांच्या हक्काचे प्रोत्साहनपर भत्त्याचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे हे पैसे अंगणवाडी सेविकांच्या हाती केव्हा पडणार? हे गुलदस्त्यातच आहे.

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. त्यानुसार दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले. या योजनेचा प्रतिसाद पाहता, ही मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. दोन महिने अर्ज भरल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यावर बोलण्यासाठी शासनाला वेळच नाही. दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी महिला सन्मान मेळावा आयोजित केला जात आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र, ज्यांच्यामुळे ही योजना यशस्वी झाली आहे, त्या अंगणवाडी सेविकांचा शासनाला विसर पडला आहे. दिवाळीपूर्वी तरी ही रक्कम मिळावी, अशी अंगणवाडी सेविकांची मागणी केली आहे. 

अर्ज भरण्याचे प्रत्येकी ५० रुपये मिळणार कधी? जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे ७ हजार पाचशे रुपये जमा झाले. मात्र, अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचे ५० रुपयांप्रमाणे मिळणारे मानधन अजूनही मिळालेले नाही

टॅग्स :gondiya-acगोंदिया