शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

शिक्षकांच्या समस्या त्वरित निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:22 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अर्जुनी मोरगाव शिक्षक समस्या निवारण सहविचार सभा पं.स. कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे नुकतीच पार पडली.

ऑनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अर्जुनी मोरगाव शिक्षक समस्या निवारण सहविचार सभा पं.स. कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे नुकतीच पार पडली. यात पंचायत समिती स्तरावरील शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्येवर चर्चा करण्यात आली.सभेला गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार, गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, वरिष्ठ शि.वि. अधिकारी सिरसाटे तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक समितीचे पदाधिकारी तालुका शिक्षक नेते रमेश गहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद बडोले, तालुका अध्यक्ष सिद्धार्थ खोब्रागडे, कार्याध्यक्ष कैलास हाडगे, राजेश मरघडे यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बहुतांश शिक्षकांच्या जीपीएफ पावत्या अप्राप्त असून त्याकरिता पं.स.कडून संबंधित प्राप्त पावत्या मिळण्यासाठी जि.प.कडे कार्यवाही करावी, आॅफलाईन वेतन करण्याची कार्यवाही त्वरित करावी, वेतन वाढीनुसार प्रोत्साहन नक्षल भत्यात वाढ करावी, मागील थकबाकी काढण्यात यावी, मूळ व दुय्यम सेवापुस्तिका सर्व नोंदिसह पूर्ण करण्यात यावे, शालेय पोषण आहार, सामान, इंधन, भाजीपाला व स्वयंपाकी मानधन त्वरित मिळावे, प्रलंबित असलेले आयकर संदर्भातील कार्य पूर्ण करावे, निवडश्रेणी प्रशिक्षणास पात्र असलेल्या शिक्षकांची यादी जि.प.कडे पाठवावे, मराठी-हिंदी भाषा सूट, पूर्वपरवानगी कार्याेत्तर परवानगी, संगणक सूट, स्थायी कर्मचारी मंजुरीस्तव प्रस्ताव जि.प.के त्वरित पाठवावे, डीसीपीएस पावती मिळण्यासाठी कार्यवाही करावी, चटोपाध्याय व निवडश्रेणी मंजूर यादीतील शिक्षकांचे वेतन निश्चितीकरिता प्रस्ताव जि.प.कडे पाठवावे, उपस्थिती भत्ता व इतर अनुदान शाळांना त्वरित मिळावे आदी मागण्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली.याप्रसंगी पी.बी. मोहबंशी, विठोबा रोकडे, गोवर्धन लंजे, पुनाराम जगझापे, भुषण लोहारे, व्ही. डी. गभणे, देवदास नाईक, मनोहर मोटघरे, आर.डी. साखरे, अर्जुन गोफणे, विजय शहारे, प्रशांत चव्हाण, सुभाष मानकर, रविंद्र वालदे, घनशाम ब्रोद्रेकर, सुरेश ब्राम्हणकर, भवेश श्हारे, विक्रमसिंह ठाकूर, मेश्राम, संदेश शेंडे, युवराज नागपुरे, प्रकाश सांगोडे, राजेंद्र राखडे, ज्ञानेश्वर कोल्हे, रेवानंद उईके, ज्ञानेश्वर कापगते, गोबाडे, मुंगमोडे, तागडे, राधाकिसन नेवारे, राजेंद्र चांदेवार, धनराज कापगते, भोजेंद्र नेवारे, सोविंदा शहारे, गिरधर नाकाडे, केशव सडमाके तसेच समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक