शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा, आता हेक्टरी 40 क्विंटल प्रमाणे विकता येणार केंद्रांवर धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 21:18 IST

धान खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवून देण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकारी  आणि शासनाला निवेदन दिले होते. त्याचीच दखल घेत शासनाने हेक्टरी धान खरेदीची मर्यादा ३० क्विंटलवरून ४० क्विंटल केली आहे. यासंबंधीचे आदेश शासनाने मंगळवारी (दि.१५) काढण्यात आले. आता धान खरेदीच्या ऑनलाईन  पोर्टलवर हा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर आता प्रतिहेक्टर ४० क्विंटलप्रमाणे धान खरेदी केली जाणार आहे. याला शासनाने मंजुरी दिली असून ऑनलाईन पोर्टलवर हा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू असून बुधवारपासून (दि.१६) या नवीन मर्यादेनुसार धान खरेदी केली जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी केली जात आहे. यंदा शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल ३० प्रमाणे धान खरेदी करण्याचे आदेश काढले होते. मात्र, जिल्ह्यातील धानाचे हेक्टरी उत्पादन अधिक असल्याने ३० क्विंटल ही मर्यादा फार कमी असल्याची ओरड शेतकऱ्यांची होती. धान खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवून देण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकारी  आणि शासनाला निवेदन दिले होते. त्याचीच दखल घेत शासनाने हेक्टरी धान खरेदीची मर्यादा ३० क्विंटलवरून ४० क्विंटल केली आहे. यासंबंधीचे आदेश शासनाने मंगळवारी (दि.१५) काढण्यात आले. आता धान खरेदीच्या ऑनलाईन  पोर्टलवर हा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे. बुधवारपासून या नवीन आदेशानुसारच धान खरेदी केली जाणार आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

११४ धान खरेदी केंद्रावरून होणार खरेदी 

- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा खरीप हंगामात धान खरेदीसाठी ११४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. या सर्व धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहे. या केंद्रावर मंगळवारपर्यंत १२३४५ क्विंटल धान खरेदी झाली आहे तर बुधवारपासून धान खरेदीच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

३० नोव्हेंबरपर्यंत करता येईल नोंदणी - शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले होते. नोंदणी करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती पण हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित असल्याने शासनाने पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

शासकीय धान खरेदी केंद्रावर बुधवारपासून हेक्टरी ४० मर्यादेनुसार धान खरेदी केली जाणार आहे. यासंबंधीचे आदेश मिळाले असून हा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे. - मनोज बाजपेयी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी

शेतकऱ्यांच्या निवेदनाची घेतली दखल - धान खरेदीच्या हेक्टरी मर्यादेत वाढ करण्यात यावी यासाठी आठवडाभरापूर्वी अविनाश काशीवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याच निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर धान खरेदीची हेक्टरी मर्यादा ३० वरून ४० क्विंटल करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डcollectorजिल्हाधिकारी