शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

गोंदिया रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात विक्रमी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:13 IST

ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आणि दैनदिन प्रवास करणाºया प्रवाशांची वाढती संख्या यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकच्या उत्पन्नात मागील दोन महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांत ६.०६ कोटींचे उत्पन्न : सप्टेंबरच्या तुलनेत आॅक्टोबरमध्ये १७.८१ लाखांनी उत्पन्न वाढ

देवानंद शहारे ।आॅनलाईन लोकमतगोंदिया : ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आणि दैनदिन प्रवास करणाºया प्रवाशांची वाढती संख्या यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकच्या उत्पन्नात मागील दोन महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे. सन २०१७ मध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही महिन्यांत गोंदिया रेल्वे स्थानकाला सहा कोटी सहा लाख सहा हजार १९१ रूपयांचे उत्पन्न मिळाले.महाराष्टÑ, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या सीमा गोंदिया जिल्ह्याला लागल्या आहेत. त्यामुळे सदर तिन्ही राज्यातील प्रवाशी गोंदिया स्थानकातूनच प्रवास करतात. त्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक अशी गोंदियाची ओळख आहे. त्यातच नागपूर, रायपूर, चंद्रपूर व जबलपूर अशा चारही दिशांकडे गोंदिया जंक्शनवरून प्रवाशी गाड्या धावतात. त्यामुळे येथे प्रवाशांची अधिक गर्दी असते.यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सामान्य तिकीट विक्रीतून गोंदिया रेल्वे स्थानकाला दोन कोटी नऊ लाख ४५ हजार ०६५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर याच महिन्यात आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून ८४ लाख ६७ हजार १३० रूपये प्राप्त झाले. सामान्य तिकीट विक्री व आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण दोन कोटी ९४ लाख १२ हजार १९५ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची नोंद गोंदिया रेल्वे स्थानकाने केली आहे. तसेच आॅक्टोबर महिन्यामध्ये सामान्य तिकीट विक्रीतून गोंदिया स्थानकाला दोन कोटी २७ लाख २३ हजार १५९ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून ८४ लाख ७० हजार ८३७ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. सामान्य तिकीट विक्री व आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून गोंदिया स्थानकाला आॅक्टोबर महिन्यात तीन कोटी ११ लाख ९३ हजार ९९६ रूपयांचे उत्पन्न मिळाले.विशेष म्हणजे यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलतेन आॅक्टोबर महिन्याचे उत्पन्न तब्बल १७ लाख ८१ हजार ८०१ रूपयांनी वाढले आहे.मागील वर्षीच्या प्रवासी संख्येशी तुलनामागील वर्ष सन २०१६ च्या सप्टेंबरमध्ये सामान्य तिकिटांवर पाच लाख ३४ हजार ९९८ व आरक्षित तिकिटांवर २५ हजार ७६३ अशा एकूण पाच लाख ६० हजार ७६१ प्रवाशांनी गोंदिया रेल्वे स्थानकातून प्रवास केला. तर त्याच्या पुढील महिन्यात आॅक्टोबरमध्ये सामान्य तिकिटांवर पाच लाख १९ हजार ५४६ व आरक्षित बोगींमधून २२ हजार ४४६ अशा एकूण पाच लाख ४१ हजार ९९२ प्रवाशांनी प्रवास केला. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१६ मध्ये एकूण ११ लाख दोन हजार ७५३ प्रवाशांनी गोंदिया स्थानकातून प्रवास केला.सन २०१७ च्या सप्टेंबरमध्ये सामान्य तिकिटांवर पाच लाख ३० हजार २५६ तर आरक्षित बोगींमधून २१ हजार २७९ अशा एकूण पाच लाख ५१ हजार ५३५ प्रवाशांनी प्रवास केला. तर आॅक्टोबरमध्ये सामान्य तिकिटांवर पाच लाख ३६ हजार ४८८ व आरक्षित बोगींमधून २४ हजार ९३४ अशा एकूण पाच लाख ६१ हजार ४२२ प्रवाशांनी प्रवास केला. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१७ मध्ये एकूण ११ लाख १२ हजार ९५७ प्रवाशांनी प्रवास केला.मागील वर्षाच्या सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांमध्ये तब्बल १० हजार २०४ अधिकच्या प्रवाशांनी गोंदिया रेल्वे स्थानकातून प्रवास केला.