अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी झेड. एम. कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतीशील शेतकरी तुकाराम बोहरे, कृषीतज्ज्ञ देवराम चुटे, प्रगतीशील शेतकरी सुरेश बोहरे, रमेश चुटे, सागर काटेखाये, विनोद दोनोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाने, कृषी पर्यवेक्षक दिगंबर ठाकरे, कृषी सहायक तुरकर, पुस्तोडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात आरोग्य पत्रिका वाचन व खत व्यवस्थापनाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच माती परीक्षणाची गरज काय? माती परीक्षणाचे उद्देश, मातीचा नमुना घेण्याची पद्धत, माती नमुना घेताना घ्यावयाची काळजी इत्यादी विषयांसोबतच कीटकनाशक फवारताना घ्यायची काळजी, भाताच्या लागवडीच्या पद्धती, भात व हरभरा पिकावरील रोग किडींचे एकात्मिक व्यवस्थापन व उपाय अशा अनेक विषयांवर सखोल मागदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कृषी सहायक नागपुरे, गोरे, भगत, बिसेन, प्रगतीशील शेतकरी माधवराव आसोले, घनश्याम कटरे, मिलिंद गजभिये, किसन हुकरे, कृषी मित्र बहेकार, आशिष बोहरे, मोतीराम भेंडारकर, भांडारकर व अन्य उपस्थित होते. संचालन करून आभार कृषी सहायक सुभाष नागदेवे यांनी मानले.