शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आढळले दुर्मीळ युरेशियन पाणमांजर

By अंकुश गुंडावार | Updated: March 29, 2025 18:21 IST

ट्रॅप कॅमेऱ्यात झाले छायाचित्र कैद : संवर्धनासाठी केल्या जाणार उपाययोजना

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सध्या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वार्षिक व्याघ्र गणना सुरू आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या गाभा व बफर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यात दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या युरेशियन पाणमांजर प्राण्याची कोका वनपरिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व संलग्न भूप्रदेशात या युरेशियन ऑटर (युरेशियन पाणमांजर) या प्रजातीचा पहिलाच छायाचित्रणात्मक पुरावा आहे. चॅम्पियन व सेठ यांच्या भारतीय जंगलांच्या वर्गीकरणानुसार हे क्षेत्र उष्णकटीबंधीय शुष्क पानझडी वन या वर्गात मोडते. निरोगी उभयचर पर्यावरणाचे सूचक म्हणून काम करून गोड्या पाण्यातील आणि किनारी परिसंस्था राखण्यात पाणमांजर महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात पाणमांजराच्या तीन प्रजाती आढळतात. तिन्ही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२, अनुसूची १ अंतर्गत संरक्षित आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाद्वारे धोकाग्रस्त असे वर्गीकृत आहे. व्याघ्र गणनेच्या फेज-चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण आणि विश्लेषण नवेगाव नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानअंतर्गत वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत अंकित ठाकूर यांनी क्षेत्रसंचालक जयरामेगौडा आर, उपसंचालक पवन जेफ यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

१९७८ मध्ये मारुती चितमपल्ली यांनी घेतली नोंदभारतात युरेशियन पाणमांजराचे वितरण प्रामुख्याने हिमालयीन पायथ्याशी, पश्चिम घाट आणि ईशान्य भारतातील काही भागात आढळते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ लेखक आणि वन अधिकारी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी या क्षेत्रात कार्यरत असताना १९७८ मध्ये सध्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात या प्रजातीची शेवटची नोंद केली होती. या व्याघ्र प्रकल्पातील उपस्थितीची ही पहिलीच छायाचित्रीत नोंद आहे. युरेशियन पाणमांजर आणि त्याच्या अधिवासाचे संरक्षण या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाwildlifeवन्यजीव