शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पोवारीटोला येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:13 IST

आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ठळक मुद्देनळ योजनेचा अभाव : नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे येथील संप्तत नागरिकांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करुन तहसीलदार डी.एस.भोयर यांना निवेदन दिले.आमगाव देवरी मुख्यमार्गावर असलेल्या पोवारीटोला येथील नागरिकांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. येथील नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेकडे नळ योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. पण अद्यापही त्याची पूर्तता करण्यात आलीे नाही. परिणामी येथील नागरिकांना पाण्यासाठी पायापीट करावी लागत आहे.पोवारीटोलासह पाणी टंचाईची झळ आमगाव रिसामा, किडंगीपार, बिरसी, बनगाव, कुंभारटोली, माल्ही व पदमपूर या गावांना सुध्दा बसत आहे. आमगाव वळगता उर्विरत गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र आमगाव शहराची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीत दररोज लागणाºया पाण्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे अल्प प्रमाणात पाणीे पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला दररोज चार लाख लिटर पाण्याची गरज आहे. पण, पाण्याची साठवण क्षमता केवळ २ लाख २५ हजार लिटरची आहे. त्यामुळेच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल सुध्दा कोरडया पडल्या आहेत. ज्या विहिरींना पाणी आहे. त्यावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या मार्गी लावण्यात यावी. यासाठी सिंधू देशकर, सोमेश्वरी रहांगडाले, शुभांगी रहांगडाले, युवराज रंगारी, राजकुमार देशकर आणि इतर नागरिकांनी नगर परिषदेचे प्रशासक डी.एस.भोयर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ही समस्या मार्गी न लागल्यास याविरुध्द तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई