शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांचे स्मारक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:11 IST

नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २३ पोलीस अधिकारी-कर्मचारी व ३४ नागरिक शहीद झाले आहेत.

ठळक मुद्देदिलीप पाटील भुजबळ : नक्षल दमन विरोधी सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २३ पोलीस अधिकारी-कर्मचारी व ३४ नागरिक शहीद झाले आहेत. नक्षल हल्ल्यात आपला प्राण गमाविणाऱ्या पोलिसांसह नागरिकही शहीद असून या सर्व शहिदांचे पोलीस विभाग वर्षभरात स्मारक उभारेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले.पोलीस विभागाच्यावतीने २० ते २७ जुलै दरम्यान आयोजीत नक्षल दमन विरोधी सप्ताहाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्राचार्य संगिता घोष, पोलीस उपअधिक्षक (गृह) सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले व राजीव नवले उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील भुजबळ यांनी, नक्षलवाद्यांची ही योजना पोलीस विभागाने मोडून काढली पाहिजे. त्यासाठी नक्षल सप्ताहाच्या अगोदरच पोलीस विभागाने नक्षल दमन विरोधी सप्ताह साजरा केला पाहिजे. विकास आणि नक्षलवाद या दोन परस्पर विरोधी भूमिका आहेत. ही बाब जनमानसात पटवून देण्याची गरज असल्याचे सांगीतले. आज पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकली अशा शब्दात प्राचार्य घोष यांनी पोलीस विभागाचे कौतुक केले. संचालन पोलीस उपनिरीक्षक राधिका कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाला गावकरी उपस्थित होते.स्पर्धेत यांनी मारली बाजीपथनाट्य स्पर्धेत येथील प्रपोगंडा सेलने प्रथम, ऐओपी धाबेपवनीने द्वितीय, पोलीस स्टेशन केशोरी व गोठणगावने तृतीय, एओपी बिजेपार व दरेकसाने चतुर्थ तर पोलीस स्टेशन डुग्गीपार यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे घोषवाक्य स्पर्धेत प्रपोगंडा सेलने प्रथम, जेटीएसईने द्वितीय, पिपरीया व बिजेपारने तृतीय, चिचगड व मगरडोहने चतुर्थ क्र मांक पटकविला. कविता सादरीकरणामध्ये पोलीस स्टेशन केशोरी प्रथम, बिजेपार द्वितीय व नवेगावबांध तृतीय क्र मांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांचे पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी कौतुक केले.विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजनसप्ताहाच्या निमित्ताने नक्षलविरोधी घोषवाक्य, पोस्टर, व्हिडीओ, पथनाट्य व कविता वाचन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत ८८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. ‘नक्षलवाद आदिवासी जनतेवरील क्रूर अत्याचार’ या विषयावर निबंध स्पर्धा तर ‘नक्षलवाद लोकशाही व विकासाचा शत्रू’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. सप्ताहादरम्यान विद्यार्थी व नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले व त्याचा लाभ एक हजार ३४८ नागरिकांनी घेतला. तर निबंध स्पर्धेत दोन हजार १६३ व वक्तृत्व स्पर्धेत ४२७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या वेळी पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नक्षल या विषयावर उत्कृष्ट पथनाट्य सादर केले.

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी