शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कोरोना काळात पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

जून,जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. धानपिक देखील संकटात आले होते. आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे सावट टळले आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर तलाव बोड्या फुल झाल्या आहे.

ठळक मुद्दे२४ महसूल मंडळात अतिवृष्टी : नवेगावबांध, बेवारटोला जलाशय ओव्हर फ्लो : पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना मागील तीन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार शुक्रवारी दिवसभर कायम होती. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहे. जिल्ह्यात मागील चौवीस तासात २५४६.४० मिमी पावसाची नोंद झाली. तर ३३ पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याने कोरोनात पावसाने कहर केल्याचे चित्र आहे.जून,जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. धानपिक देखील संकटात आले होते. आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे सावट टळले आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर तलाव बोड्या फुल झाल्या आहे. मागील चौवीस तासात ३३ पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. संततधार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून पुजारीटोला धरणाचे १२ दरवाजे, कालीसराड धरणाचे ४ आणि संजय सरोवर धरणाचा १ दरवाजा उघडण्यात आला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाबांध जलाशय आणि सालेकसा तालुक्यातील बेवारटोला जलाशय शंभर टक्के भरले असून शुक्रवारी (दि.२८) ते ओव्हरफ्लो झाले. तर इडियाडोह धरण देखील ८५ टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी घरांची आणि झाडांची सुध्दा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मागील चौवीस तासात झालेल्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.रेड अर्लटहवामान विभागाने पुढील २४ तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने गोंदिया, आमगाव शहरातील वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखालीजिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून सिंचन प्रकल्पाच्या पाणी पातळीत सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी नाले सुध्दा दुथडी भरुन वाहत असल्याने नाल्याचे पाणी शेतांमध्ये भरल्याने हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली आली आहे. त्यामुळे केलेली रोवणी वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शेकडो घरांची पडझडमागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने आणि काही भागात अतिवृष्टीची नोंद झाल्याने मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडांची सुध्दा मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. रस्त्यावर झाडे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुध्दा काही वेळ खोळंबली होती.हे मार्ग झाले बंदजिल्ह्यात मागील चौवीस तासात सर्वाधिक १४१.५० मिमी पावसाची नोंद देवरी तालुक्यात झाली आहे. संततधार पावसामुुळे आमगाव-देवरी, ओवारीटोला-गोटाबोडी, पांढरवानी-कन्हाळगाव,रोपा-पालांदूर, परसोडी-आलेवाडा, मोहगाव-गडेगाव, शिलापूर-फुक्टीमेटा, अंभोरा-निलज हे मार्ग बंद झाले होते. सालेकसा तालुक्यातील दरेकसा-डहाराटोला व बंजारीकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.या महसूल मंडळात अतिवृष्टीमागील चौवीस तासात जिल्ह्यात २५४६.४० मिमी. पावसाची नोंद झाली सरासरी ७७.१० मिमी पाऊस पडला आहे. ३३ पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात गोंदिया तालुक्यातील दासगाव ६८ मिमी, रावणवाडी ७५ मिमी, खमारी ६९ मिमी, कामठा ७० मिमी, गोरेगाव तालुक्यात मोहाडी १०२ मिमी, गोरेगाव ७० मिमी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ७० मिमी, बोंडगावदेवी ७३ मिमी, अर्जुनी मोरगाव ७२ मिमी, महागाव ६६ मिमी, केशोरी ६८ मिमी, देवरी तालुक्यात मुल्ला ७० मिमी, चिचगड ७९ मिमी, देवरी १४१.५० मिमी, आमगाव तालुक्यातील कट्टीपार ९८.४० मिमी, आमगाव ७८ मिमी, तिगाव ९२.८० मिमी, सालेकसा तालुक्यात कावराबांध ८२.२०, सालेकसा ८८.४०, साकरीटोला ९८ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :RainपाऊसHajara Fallहाजराफॉल