शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाच महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:18 IST

रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० मि.मी.पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देप्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ : घरांची पडझड, रोवण्यांना संजीवनी, बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी (दि.२७) जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची तर जिल्ह्यात सरासरी २६.४८ मि.मी.पावसाची नोंद झाली.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली असून रोवण्यांना सुध्दा संजीवनी मिळाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० मि.मी.पावसाची नोंद झाली.तीन दिवस झालेल्या पावसामुळे गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात आठ ते दहा घरांची पडझड झाली.त्यामुळे नागरिकांना नुकसान सहन करावे लागले.पावसाचा जोर कायम असला तरी जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने अद्यापही तूट कायम आहे. यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाल्याने रोवणीची कामे लांबली होती. आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीला रोवणीच्या कामाला वेग आला. रोवणी केल्यानंतर आठ दहा दिवसांच्या कालावधीत पावसाची गरज असते.यामुळे पिकांची चांगली वाढ होते.जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रोवणी केलेल्या धान पिकांना संजीवनी मिळाली.त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. तर सिंचन प्रकल्पात ५० टक्क्यांवर पाणीसाठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती