शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

जिल्ह्यात पंधरा दिवसांनंतर बरसल्या पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

हवामान विभागाने यंदा सुरुवातीलाच १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे फोल ठरला. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी आटोपली, मात्र ज्या शेतकऱ्यांची शेतीवर थेंबी पावसावरच अवलंबून आहे ते शेतकरी अडचणीत आले होते.

ठळक मुद्देरोवणीच्या कामाला येणार गती : बळीराजा सुखावला, रस्त्यांवर साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे तलाव, बोड्या, नदीनाले सर्वच कोरेडे पडले होते. तर पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवण्यादेखील खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली होती. दरम्यान शुक्रवारी (दि.२३) सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यांवर पाणी साचले होते. तर शेतकऱ्यांवरील काळजीचे सावट काही प्रमाणात दूर झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.हवामान विभागाने यंदा सुरुवातीलाच १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे फोल ठरला. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी आटोपली, मात्र ज्या शेतकऱ्यांची शेतीवर थेंबी पावसावरच अवलंबून आहे ते शेतकरी अडचणीत आले होते. जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. मात्र जुलै महिना संपत आला तरी केवळ २५ टक्केच रोवण्या झाल्या होत्या. तर तलाव, बोड्या, नदीनाले सुध्दा कोरडे पडले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तर पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पावसाअभावी उकाड्यातदेखील प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयसुध्दा त्रस्त झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची बॅटिंग सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरूच होती. त्यामुळे शेतातील बांध्यामध्येसुध्दा पाणी साचल्याचे तर नालेसुध्दा दुथडी भरून वाहत असल्याचे दिलासादायक चित्र होते. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.

दोन तालुक्यात अतिवृष्टीजिल्ह्यात गेल्या २४ तासात ४७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर तिरोडा आणि गाेरेगाव तालुक्यात ६५ मि.मी. वर पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र होते.

पावसाची तूट कायमजिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२०.३ मि.मी. पाऊस पडतो, तर १ जून ते २३ जुलै या कालावधीत ५००.६ मि.मी. पाऊस पडतो. मात्र यंदा याच कालावधीत ४४९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची एकूण टक्केवारी ८९. ८ टक्के आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस