शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला अपघाताची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:12 IST

पादचारी उड्डाण पुलावरुन फलाटावर जाण्याऐवजी बरेच प्रवासी शार्टकटचा अवलंब करुन बेधडकपणे रेल्वे ट्रॅक ओलांडून जातात. हा प्रकार गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसांपासून सुरूच आहे.

ठळक मुद्देबेधडकपणे ट्रॅक ओलांडणे सुरूच : कारवाईकडे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमत गोंदिया : पादचारी उड्डाण पुलावरुन फलाटावर जाण्याऐवजी बरेच प्रवासी शार्टकटचा अवलंब करुन बेधडकपणे रेल्वे ट्रॅक ओलांडून जातात. हा प्रकार गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. या धोकादायक प्रकाराकडे वांरवार रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.रॅम्पवरून चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी रेल्वेच्या पादचारी पुलाचा वापर टाळून प्रवासी बेधडकपणे ट्रॅक ओलांडून एका फलाटावरून दुसºया फलाटावर जाण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा गाडी ट्रॅकवर आल्यावर देखील प्रवासी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे ज्यावेळी गाडी ट्रॅकवर येते तेव्हा तिथे रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित असतात. हा सर्व जीवघेणा प्रकार त्यांच्या डोळ्यादेखत दररोज घडत असताना अद्यापही या प्रकाराला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे रेल्वे विभाग सुरक्षाविषयक उपाय योजना राबविण्यात कितपत सजग आहे, हे दिसून येते.सकाळी सर्वाधिक धोकाहावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेच्यावर प्रवाशी आणि मालगाड्या धावतात. महाराष्टÑ एक्सप्रेस, गोंदिया-बल्हारशा, गोंदिया-बालाघाट या गाड्या होम फलाटावरुन सुटतात. बरेचदा या गाड्या सुटत असताना प्रवाशी ट्रॅक ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. तसेच फलाट क्रमांक वरील पादचारी उड्डाणपुल फारच अरुंद असल्याने या पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळे शेकडो प्रवाशी पादचारी पुलांवरुन जाण्याऐवजी ट्रॅक ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार प्रामुख्याने सकाळच्या वेळेत सर्वाधिक दिसून येतो.तिरोडा रेल्वे स्थानकावर समस्यातिरोडा रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसºया प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी बेलाटी गावाच्या दिशेने बुकिंग आॅफिसजवळ जुने पूल आहे. परंतु तिरोडा शहरातून येणारे प्रवासी या पुलाचा उपयोग खूपच कमी करतात. ते सरळ मालगोदामाजवळील पायवाटेने रेल्वे मार्ग ओलांडून प्लॅटफॉर्म-१ वर जातात. तर प्लॅटफॉर्म-१ वर उतरलेले प्रवासी शहरात जाण्यासाठी पुन्हा रेल्वे ट्रॅक ओलांडून याच पायवाटेने शहराकडे जातात. या प्रकारामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे.सुविधांकडे कानाडोळागोंदिया रेल्वे स्थानकाचा विकास झपाट्याने होत आहे. शिवाय दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे हे स्थानक असून येथून प्रवास करण्याºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. येथे ट्रॅक ओलांडताना अनेक अपघात घडले आहेत. हा प्रकार बंद व्हावा यासाठी स्थानकावर विविध सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. प्लॅटफॉर्म-५ व ६ साठी रॅम्प तयार करण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म-२ साठी रॅम्पचे बांधकाम सुरू आहे. तसेच ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी होमप्लॅटफॉर्मवर व प्लॅटफॉर्म-३ तथा ४ वर लिफ्टची सोय करण्यात आली आहे. तसेच होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.कर्मचाऱ्यांचा अभावयाबाबत रेल्वेचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, गोंदिया रेल्वे स्थानकात मनुष्यबळाचा अभाव आहे. स्थानकात थोड्याथोड्या वेळाने प्रवासी गाड्यांचे आगमन होते. गुन्हेगारी किंवा चोरीसारख्या घटना घडत असल्याने रेल्वे पोलीस किंवा जीआरपीचे कर्मचारी तिकडे जातात. अशावेळी प्रत्येक गाडीच्या आगमनाप्रसंगी प्रवाशांच्या कृत्यांवर लक्ष ठेवणे कठिण असते. शिवाय रेल्वे नियमांचे उल्लंघन होवू नये, यासाठी तशी उद्घोषणा केली जाते. तरीही प्रवाशांवर प्रभाव पडत नसेल तर हा त्यांचा स्वत:चा दोष आहे.उद्घोषणेकडे प्रवाशांचे दुर्लक्षरेल्वे नियमांचे उल्लंघन होवू नये, रॅम्प व पादचारी पुलाचा वापर व्हावा. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रॉनिक उद्घोषणा वारंवार केली जाते. परंतु काही प्रवासी लवकरच स्थानकाबाहेर पडण्यासाठी या उद्घोषणेकडे दुर्लक्ष करतात व ट्रॅक ओलांडण्याचा प्रकार घडतो. मजिस्ट्रेट चेकिंगदरम्यान रेल्वे पोलीस किंवा जीआरपीचे कर्मचारी अशा प्रवाशांना पकडतात. मात्र त्यानंतर रेल्वे विभाग याकडे दुुर्लक्ष करते. त्यामुळे हा प्रकार अजुनही सुरूच आहे.