शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी

By admin | Updated: October 13, 2016 01:48 IST

जिल्हा पोलिसांनी सोमवारी ठिकठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डांवर धाडी घालून २० आरोपींना अटक केली.

२० आरोपींना अटक : रोख रकमेसह मोबाईल जप्तगोंदिया : जिल्हा पोलिसांनी सोमवारी ठिकठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डांवर धाडी घालून २० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून जुगारात खेळल्या जाणाऱ्या हजारो रुपयांसह अनेक मोबाईल सेट जप्त करण्यात आले.गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आयटीआय फुलचूर पेठ येथे सोमवारी रात्री ८.३० वाजता धाड घालून भूषण सीताराम गणवीर (३५) रा. भीमनगर, संतोष भरतलाल खोब्रागडे (३५) रा. भीमनगर, मुन्ना सिताराम बोपचे (४०) रा.डव्वा, दीपक शिवनाथ कोडापे (३१) रा. फुलचूर या चौघांवर मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस नायक सतीश शेंडे यांनी केली. सदर आरोपी जवळून १० हजार ७७५ रुपये रोख व तीन मोबाईल जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या बाजूला सोमवारच्या रात्री ८.३० वाजता करण्यात आली. आरोपी सुंदरसिंग मंमलसिंग नागपुरे (४२) रा. सब्जीमंडी गोंदिया व समीर पिपरराज खापेकर (३१) रा. रामनगर बाजार चौक गोंदिया हे दोघेही सट्टापट्टी घेत असताना त्यांच्याकडून ४ हजार ४०० रुपये व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तीसरी कारवाई मालवीय वार्डाच्या कुंभारटोली येथे घडली. खुर्शिद यासीम सैय्यद (४९) रा. गौतमनगर हा सट्टापट्टी घेत असताना त्याच्याकडून ४ हजार रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. शास्त्री वॉर्डातील दिनेश बकाराम कापसे (३५) हा नंगपुरा मुर्री येथे सोमवारी रात्री १०.३० वाजता सट्टापट्टी घेत असताना त्याच्याकडून २६०० रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. खातीया येथील शशीकांत अनिरुद्ध मेश्राम (३१) हा सोमवारच्या रात्री ११.१० वाजता गोंदिया शहराच्या चंद्रशेखर कार्डात सट्टापट्टी घेत असताना त्याच्याकडून १८१० रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. गोंदिया शहरात सोमवारच्या रात्री ९.३० वाजता सट्टापट्टी घेणाऱ्या लक्ष्मीनगरातील सनैया (४५), अजय दीपक बन्सोड (२६) रा.गढ्ढाटोली,, नरेश नत्थू गेडाम (४४) रा. कालीमंदिर गोंदिया या तीघा जवळून ४४७० रुपये रोख व तीन मोबाईल असा एकूण ७६७२ रुपयाचा माल जप्त करण्यात आला.रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रेलटोली येथे सट्टापट्टी घेणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अमीत भीमराव नंदागवळी (३०), कमलेश कार्तिक नागवंशी (२७), बखू लक्ष्मण रंगारी (६०) सर्व रा. आंबेडकर वार्ड गोंदिया, फारुक लाकूब शेख (४९) रा. फुलचूर पेठ, कलीम निजाम शेख (४३) रा. पांढराबोडी, दीपक दौलत डहाट (५८) रा. आंबेडकर वार्ड गोंदिया व शंकरलाल रामनारायण अग्रवाल रा. गोंदिया हे सोमवारच्या रात्री १० वाजता रेलटोली येथे सट्टापट्टी घेत असताना त्यांच्या जवळून ५ नग मोबाईल, २१२० रुपये रोख असा एकूण ४५७० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या यादव चौक कस्तुरबा वार्डात इकराम उर्फ सद्दाम अयुब शेख (२५) हा सोमवारच्या रात्री ८ वाजता सट्टापट्टी घेत असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळून १६५० रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर आरोपींवर मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)