शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी रब्बीतील धान करपले; शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:45 IST

मोहगाव तिल्ली परिसरात गंभीर स्थिती : काही शेतकऱ्यांनी हिरवा धान कापला

दिलीप चव्हाण लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मोटारपंप असूनही नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान करपले तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी धानाचे नुकसान होत असल्याचे पाहून हिरवा धान कापणी करून संताप व्यक्त केला. हा प्रकार तालुक्यातील मोहगाव तिल्ली परिसरात गुरुवारी (दि. २०) घडला.

जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गोरेगाव तालुक्यातही रब्बी धानाची १० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील रोवणी आटोपली असून, धानाला पाण्याची गरज आहे. रब्बीसाठी जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कृषिपंपाद्वारे पाणी करून पीक घेतात. पण कृषिपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्यात कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, तर कधी कमी विद्युत दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीला सिंचन करणे कठीण या समस्येने या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली येथील शेतकरी विनोद गोपीचंद पटले यांनी आपल्या शेतात रब्बीच्या हंगामात लावलेला धान गर्भावस्थेत असताना पाण्याअभावी करपत असल्याचे पाहून कापणी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पुढे आला आहे, तर पटले यांच्या प्रमाणेच इतरही शेतकऱ्यांची स्थिती आहे. मोटारपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने अनेक शेतकरी चिंतातुर असून, त्यांच्यावर हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.

महावितरण विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्तमोहगाव तिल्ली येथील शेतकरी विनोद पटले यांनी आपल्या शेतात रब्बीच्या हंगामात धानाची रोवणी केली होती. मात्र तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली दोन ट्रान्सफॉर्मर १५ दिवसांपूर्वी जळाल्याने रब्बी हंगामात लावलेल्या धान पिकाला पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे शेतकरी विनोद पटले यांच्यावर हिरवा धान कापण्याची नामुष्की आली. मोहगाव तिल्ली येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला.

पंधरा दिवसांपासून ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती नाहीपंधरा दिवसांपूर्वी तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली येथील एक रोहीत्र जळाले आहे. या संदर्भात बऱ्याचदा शेतकऱ्यांनी तेढा उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणावर धान पाण्याअभावी करपत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मोटारपंपांना अखंडित वीजपुरवठा कधीशेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषिपंपाला अखंडित आठ तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. लोकप्रतिनिधी त्यांना आश्वासन देत आहेत. पण अद्यापही चार तास विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना विजेच्या समस्येमुळे तोंडचा घास हिरावण्याची चिंता सतावत आहे.

दोन दिवसात समस्या मार्गी लावामोहगाव तिल्ली येथील रोहीत्र जळून पंधरा दिवस झाले पण अद्यापही त्याची दुरुस्ती केली नाही. याचा या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दोन दिवसात ही समस्या मार्गी लावण्याची मार्गी आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया