शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे ३२१ कोटी रुपयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

रब्बी हंगामातील आतापर्यंतची विक्रमी खरेदी असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ५६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दीड महिन्यापूर्वीच धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ४१७ काेटी रुपये असून यापैकी आतापर्यंत ९६ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे तर, ३२१ काेटी रुपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना करण्यात आले नाही.

ठळक मुद्देशेतकरी सावकारांच्या दारात : ५० हजारांवर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अद्यापही न मिळाल्याने जिल्ह्यातील ५० हजारांवर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. खरीप हंगामाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना नातेवाईकांकडे उधार उसनवारी आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामाप्रमाणेच जिल्ह्यात रब्बी हंगामातसुद्धा शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामात ११४ धान खरेदी केंद्रावरून २२ लाख ४४ हजार क्विंटल धानाची खरेदी केली. ही रब्बी हंगामातील आतापर्यंतची विक्रमी खरेदी असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ५६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दीड महिन्यापूर्वीच धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ४१७ काेटी रुपये असून यापैकी आतापर्यंत ९६ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे तर, ३२१ काेटी रुपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना करण्यात आले नाही. चुकारे करण्यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला अद्यापही निधी वर्ग करण्यात आला नाही. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून ५० हजारांवर शेतकरी चुकाऱ्यांसाठी बँका आणि शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील धानाची रोवणी सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र, स्वत:च्या विकलेल्या धानाचे पैसे त्यांना न मिळाल्याने नातेवाईक आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगून हात वर करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

बोनसचे १५० कोटी रुपये थकलेnखरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटल धानापर्यंत प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र, यापैकी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना बोनसची ५० टक्के रक्कम देण्यात आली होती. यासाठी जिल्ह्याला १३९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता तर, उर्वरित ५० टक्के बोनस देण्यासाठी १५० काेटी रुपयांच्या निधीची गरज आहे. 

गोदामांची समस्या कायम खरीप आणि रब्बी हंगामांत एकूण ५५ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १५ लाख क्विंटल धानाची आतापर्यंत भरडाईसाठी उचल करण्यात आली आहे. उर्वरित ४० लाख क्विंटल धान अद्यापही गोदामातच पडला आहे.  धान साठवून ठेवण्यासाठी बऱ्याच प्रमाणात शाळांचासुद्धा वापर करण्यात आला आहे. गोदामांची समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड