गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्या गावांचे मूल्यमापन करतांना सोडविलेल्या तंट्याचे अवलोकन करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याचे अनेक समित्या सांगतात. मात्र या प्रतिबंधात्मक उपाय योजना गावात खरोखरच राबविल्या जातात किंवा नाही याची शहानिशा समितीच्या सदस्यांनी गावकर्यांकडून करुन घ्यावी, त्यानंतरच त्या गावाला गुणदान करावे, असे तंटामुक्तीचे समन्वयक किशोर कटारे यांनी सांगितले. पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया सभागृहात गोंदिया जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात गठीत करण्यात आलेल्या बाह्य जिल्हा मूल्यमापन समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी समितीतील सदस्यांना तंटामुक्त मोहीमेच्या स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यमापन कोणत्या आधारावर करावे, यासंदर्भात मार्गदर्शन कटारे यांच्याकडून करण्यात आले. मूल्यमापन समितीने कसल्याही आमिषाला बळी न पडता सोडविलेल्या तंट्याना शासन निर्णयाच्या आधारावरच करावे. तंटे सोडविण्यासाठी नोंदवहीत नोंद केली. त्यांना गुणदान करता येणार नाही. दाखल केलेले तंटे सोडविले असल्यास त्यांनाच गुणदान करावे असे सूचविण्यात आले. यावेळी कोणत्या तंट्याना किती गुण द्यावे, यासंबधी असलेल्या माहितीचे पत्रकही या समितीच्या सदस्यांना देण्यात आले. या प्रशिक्षणाला गोंदिया समितीचे अध्यक्ष तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सरकारी वकील पी.एस. तिरपुडे, पं.स. सभापती सरिता अंबुले व संतोष शर्मा, आमगाव तालुक्याचे तहसीलदार राजीव शक्करवार, पोलीस निरीक्षक बारीकराव मडावी, सरकारी वकील वाय.एस. राऊत, सभापती हनुवंत वट्टी, व दिपक शर्मा, तिरोडा तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक, पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, सरकारी वकील एच.पी. रणदिवे, सभापती ललीता जांभूळकर, प्रदीप तापणकर, गोरेगाव तालुक्याचे तहसीलदार डी.ए.सपाटे, पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, सरकारी वकील कु.एस.आर. तिवारी, सभापती चित्रकला चौधरी, प्रमोद नागनाथे, सालेकसाचे तहसीलदार जी.एन.खापेकर, पोलीस निरीक्षक एस.पी. रणदिवे, सरकारी वकील प्रदीप सेंगरे, सभापती छाया बल्हारे व सागर काटेखाये, देवरीचे तहसीलदार रविंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक संजू जॉन, सरकारी वकील एस.एन.जैन, सभापती कामेश्वर निकोडे व देवेंद्र सेलोकर, सडक/अर्जुनीचे तहसीलदार एन.जी.उईके, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सरकारी वकील पी.एस.आगाशे, सभापती निर्मला उईके व निषांत राऊत उपस्थित होते. या समितीतील सदस्यांना तंटमुक्त मोहीमेसंदर्भातील सर्व नोंदवह्यांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील चमू बाह्य मुल्यमपनासठी जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
नागरिकांशी संवाद साधूनच तंमुसचे गुणदान करा- कटारे
By admin | Updated: May 31, 2014 23:35 IST