शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

किराणाच्या यादीतून डाळी ‘आऊट’

By admin | Updated: February 22, 2015 01:31 IST

‘दाल रोटी खाओ, प्रभुके गुण गाओ...’ ही सर्वत्र प्रचलीत असलेली म्हण आज मात्र खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामागचे कारण असे की, ...

गोंदिया : ‘दाल रोटी खाओ, प्रभुके गुण गाओ...’ ही सर्वत्र प्रचलीत असलेली म्हण आज मात्र खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामागचे कारण असे की, डाळींच्या चढत्या किमतीमुळे डाळ खरेदी करणे आजसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर झाले आहे. गुरूवारचे (दि.१९) भाव बघितल्यास डाळ ९० रूपये किले दराने विक्री झाली. हेच कारण आहे की, किरानाच्या यादीतून डाळी आऊट होत आहेत. जेवणाचा परिपूर्ण मेन्यू म्हटला की, डोळ््यापुढे वरण, भात भाजी व पोळी असलेले ताट येते. यात वरणाचा पहिला क्रमांक असतो. आजघडीला मात्र वाढत्या महागाईमुळे जेवणात पहिल्या क्रमांकावर असलेले हे वरण ताटातून गायब होत आहे. डाळींचे गगनाला भिडत चाललेले भाव यास कारणीभूत असून महागड्या डाळी खरेदी करण्यासाठी सर्व सामान्य माणूस धजावत नसल्याचे दिसून येते. परिणामी जेवणाच्या ताटातून वरण गायब होत आहे. गुरूवारी (दि.१९) भाव बघितल्यास, ठोक बाजारात डाळ आठ हजार ३०० ते आठ हजार ४०० रूपये प्रति क्विटल पर्यंत होती. तर चिल्लर बाजारात ९० रूपये प्रतिकिलो दराने विकल्या गेली. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात थोक बाजारात ७५-७६ रूपये प्रति किलो विकल्या गेलेल्या बेस्ट फटका तुर डाळीच्या भावात वाढ झाली आहे. मिडीयम क्वालिटी तुरीच्या डाळीतही जानेवारी महिन्यात वाढ झाली आहे. गुरूवारी ही डाळ सात हजार ६०० ते सात हजार ८०० रूपये क्विंटल विकल्या गेली. विशेष म्हणजे भाववाढीचे हे परिणाम चना, उडीज, बरबटीच्या डाळीवरही जाणवले. (शहर प्रतिनिधी)