शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पुजारीटोला धरणाचे 12 दरवाजे उघडले,दिला अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता पुजारीटोला धरणाचे १२ दरवाजे २ फुटांनी उघडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  लगतच्या मध्य प्रदेश आणि धरण क्षेत्रात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला, तर शनिवारीसुद्धा या भागात पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे १२ आणि देवरी तालुक्यातील सिरपूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता पुजारीटोला धरणाचे १२ दरवाजे २ फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे या धरणातून क्युमेक्स ५६७.८१ म्हणजे  २००५२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुजारीटोला धरण यंदा १०० टक्के भरले आहे, तर देवरी तालुक्यातील सिरपूर जलाशयाचेसुद्धा सात दरवाजे उघडण्यात आले. ३ दरवाजे १ फुटाने, तर ४ दरवाजे २ फुटाने उघडण्यात आले असून, यातून १०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. संजय सराेवर, पुजारीटोला आणि सिरपूर धरणाचे दरवाजे उघडल्याने बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठलगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दिला आहे. 

पाणीटंचाईचे संकट टळले 

- जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बहुतेक धरणांमध्ये ७० टक्केच्या वर पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. खरिपातील धान निघण्याच्या मार्गावर असल्याने यंदा रब्बीसाठी मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण