शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

वीज बिलाची होळी करुन नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनातंर्गत शनिवारी जिल्ह्यातही या दरवाढीचा विरोध करुन सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच गायीच्या दुधाला प्रति लीटर दहा रु पये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रती किलो ५० रु पये अनुदान, शासनाकडून ३० रु पये प्रति लीटर दराने गायीच्या दुधाची खरेदी करण्यात यावी. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने : वीज बिल माफ करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना नावे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संंक्रमनामुळे राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये अवाजवी दरवाढ करण्यात आली आहे. हा सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड आहे. भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनातंर्गत शनिवारी जिल्ह्यातही या दरवाढीचा विरोध करुन सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच गायीच्या दुधाला प्रति लीटर दहा रु पये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रती किलो ५० रु पये अनुदान, शासनाकडून ३० रु पये प्रति लीटर दराने गायीच्या दुधाची खरेदी करण्यात यावी. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.तिरोडा : तालुक्यातील दवनीवाडा मंडळ येथे आ.विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे, बाजार समिती सभापती चितांमन रहांगडाले, अशोक रिनायत, अजाबराव रिनायत, सुरेश पटले, महेंद्र बघेले, हितेंद्र लिल्हारे, सुंदर अग्रवाल, राजेश उरकुडे, बंटी श्रीभात्री, गौरी बिसेन, महेंद्र कटरे, नेहरु उपवंशी, परमानंद मेश्राम, आत्माराम दसरे, ममता जतपेले, सोनू चौरागडे उपस्थित होते.सालेकसा : सालेकसा येथे वनविभागासमोरील चौकात तालुकाध्यक्ष गुणवंत (मुन्ना) बिसेन यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी सुनील अग्रवाल, राजेंद्र बडोले, यादन नागपुरे, प्रतिभा परिहार, मधू अग्रवाल, देवराम चुटे, टिना चुटे, आदित्य शर्मा, खेमराज लिल्हारे, रामदास हत्तीमारे, आर.डी.रहांगडाले, बाबा तुरकर, संजय कटरे, गादीप्रसाद भगत, बाबा परिहार, हेतराम शहारे, भिमा बोहरे, पृथ्वी शिवणकर, राजेंद्र वालदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.गोंदिया : येथे जिल्हा भाजप कार्यालयसमोरील चौकात माजी आ. रमेश कुथे यांच्या नेतृत्वात वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुळकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम, प्रफुल्ल अग्रवाल, नगरसेवक दिलीप गोपलानी, योगराज रहांगडाले, मिनू बडगुजर, शंभुशरणसिंह ठाकूर, अशोक चौधरी, अशोक जयसिंघानिया, मनोज मेंढे, राजा कदम, सुरेश चंदनकर, अमृत इंगळे, चंद्रभान तरोणे, मोंटू पुरोहित, गोल्डी गावंडे, विनोद चांदवानी, सुशिल राऊत, पारस पुरोहित, धमेंद्र डोहरे, राजेश चौरिसया, बबली ठाकूर, मिलिंद बागडे, मंगलेश गिरी आदी उपस्थित होते.अर्जुनी मोर. : येथे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर, तालुका महामंत्री भोजू लोगडे, नुतन सोनवाणे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मंजुषा तरोणे, केवळराम पुस्तोडे, उमाकांत ढेंगे, रामदास कोहाटकर, रघुनाथ लांजेवार, डॉ. गजानन डोंगरवार, डॉ.नाजुकराव कुंभरे, चामेश्वर गहाणे, व्यकंट खोब्रागडे, डॉ. वामन ब्राम्हणकर, रामू केशरवानी, गिरीश बागडे, मुरलीधर ठाकरे, होमराज ठाकरे, रत्नाकर बोरकर, संदिप कापगते, विजय कापगते, रामलाल मुंगणकर, लैलेश शिवणकर, होमराज पुस्तोडे, रमेश मस्के, दिपंकर उके उपस्थितीत होते.

टॅग्स :Socialसामाजिक