शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक संघाचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:34 IST

Gondia : १५ मार्चचा सुधारित संच मान्यता निर्णय रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे ६ ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित धोरणानुसार अनुदान टप्पा तत्काळ लागू करावा. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व एक नंबर २००५ नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासन निर्णय १५ मार्चचा सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळा तेथे मुख्याध्यापक पद हे धोरण असावे.

शासन निर्णय १५ मार्च २०२४ इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गाचा दर्जा वाढ निर्णय तत्काळ रद्द करावा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती त्वरित करावी. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना तत्काळ लागू करावी. वाढीव टप्पा अनुदान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरित मंजूर करण्यात यावा. शासन निर्णय १५ मार्च २०२४ रद्द करण्यात यावा. संच मान्यता सुधारित करून जुन्याप्रमाणे करण्यात यावी. संच मान्यता त्रुटी प्रस्ताव प्रलंबित प्रस्ताव सुधारित करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देऊन त्वरित प्रकरणे निकाली काढण्यात यावी. शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात यावे. मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षे आश्वासित प्रगती योजना मंजूर करण्यात यावी.

अंशतः अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक पद संच मान्यतेत दर्शविण्याबाबत, संच मान्यतेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजुरी पदे दर्शविण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक मारुती खेडेकर, डी. आर. गिरीपुंजे, जिल्हाध्यक्ष दुर्गा पटले, सचिव ओमप्रकाश पवार, मुख्याध्यापिका रजिया बेग, मुख्याध्यापक विकास बारापात्रे, भूपेश त्रिपाठी यांनी कळविले आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया