शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जिल्ह्यातील प्रकल्प लबालब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:25 IST

मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यावर पावसाची मेहरबानी : लघु, मध्यम प्रकल्प व तलावही फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षीची नाराजी दूर करीत यंदा पावसाने जिल्ह्यावर आपली मेहरबानी दाखविल्याचे दिसून येत आहे. यंदा भरभरून पाऊस बरसल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने लबालब आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील चार मोठे प्रकल्प वगळले तरिही अधिकांश लघु, मध्यम व मालगुजारी तलावही फुल्ल झाले आहेत. अशात येत्या दिवसांत आणखी पाऊस बरसल्यास उरलेले प्रकल्प व तलावही भरणार यात शंका दिसत नाही.मागील वर्षी पावसाने नाराजी दाखविली होती. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत ठणठणाट होता. यंदाही पाऊस दगा तर देणार नाही ना अशी भिती होती. मात्र हवामान खात्याने यंदा वर्तविलेला अंदाजही खरा ठरला व जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांत भरभरून पाणीसाठा आहे. यात इटियाडोह प्रकल्पात आजघडीला ६६.२८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ६३.७८ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ९५.५९ टक्के तर कालीसराड प्रकल्पात ९४.८२ टक्के एवढा पाणीसाठा आहे.या चार मुख्य प्रकल्पांची ही स्थिती असतानाच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर व कटंगी हे पाच प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर चुलबंद प्रकल्पात ६९.८२ टक्के, खैरबंधा प्रकल्पात ९०.०५ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ९८.८२ टक्के पाणासाठा आहे. तसेच २२ लघु प्रकल्पांतील डोंगरगाव, गुमडोह, कालीमाती, मोगरा, पिपरीया, पांगडी, राजोली, सोनेगाव, जुनेवानी व बेवारटोला हे १० प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. तर आक्टीटोला प्रकल्पात ८८.८५ टक्के, हरी ९२.२१, रेहाडी ८२.२३, सडेपार ७६.३५, सेरपार ७१.२७, वडेगाव ९३.९३, उमरझरी ९५.८३ टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रकारे, जिल्ह्यातील ३८ मालगुजारी तलावांतील भानपूर, चान्नाबाक्टी, फुलचूर, गंगेझरी, कवठा, कोहलगाव, खैरी, खमारी, काटी, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहुरकुडा, पळसगाव सौं, पालडोंगरी, पळसगाव डव्वा, पुतळी, सौंदड, तेढा या २० तलावांत १०० टक्के भरलेले आहेत. शिवाय उर्वरीत तलावांतील बहुतांश तलाव ५० टक्केच्यावर भरलेले आहेत.यंदा रबीचा हंगाम होणारमागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे प्रकल्पांत पाणीसाठा नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रब्बीसाठी पाणी न देण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातून गेल्यानंतर रबीचा हंगामही शेतकऱ्यांना घेता आला नव्हता. यंदा मात्र चांगला पाऊस झाला असून आता उर्वरीत काही दिवसांत आणखी पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार असे बोलता येईल. असे झाल्यास रबीचा मार्ग मोक ळा होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Waterपाणी