शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी पुकारलेल्या एल्गाराची परिणिती, जिल्ह्यातील ८१० गावांमध्ये दारूबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 10:19 IST

गावागावात दारूविरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारूबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशी भूमिका देखील महिला मंडळी घेत आहे.

ठळक मुद्दे२९१ गावांना दारूबंदीचा ध्यास

नरेश रहिले

गोंदिया : गडचिरोलीनंतर गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारूबंदी होण्याच्या मार्गावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार १,१०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारूबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे दारूबंदी संदर्भात जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या व महिला मंडळी किती सजग आहेत, याची प्रचिती येते.

दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तीचा मृत्यू होतो. परंतु दारूमुळे दारू पिणाऱ्यांचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होते. यासाठी दारूविरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावात दारूविरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारूबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशी भूमिका देखील महिला मंडळी घेत आहे. परिणामी आपली मते खराब होणार नाहीत याची काळजी घेत दोन-चार दारूविक्रेत्यांच्या विरोधात समीकरण तयार करून गावात दारूबंदीसाठी ठराव घेण्याचा प्रयत्न करतात.

गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोट्या-मोठ्या १,१०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारूबंदी केल्याची बाब पुढे आली आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या शासन निर्णयात गावातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धंदे बंद पाडून त्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवैध धंदे म्हणजे दारूला आपल्या गावातून हद्दपार करण्याचा मानस महिलांनी बांधला. दारू विकणाऱ्यांचे धंदे बंद करून त्यांना गावात सुरू होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामावर प्राधान्य देण्यात आले आहे.

आर्थिक बचत; कलह कमी

दारूमुळे पैशाची नासाडी होते, गृहकलह वाढतात. यामुळे महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने ८१० गावांतील दारूबंदी करण्यात आली. त्यामुळे या गावातील दारू पिणाऱ्या व्यक्तींची पैशांची बचत झाली. दारूबंदी झाल्याने वादही कमी झाले. दारूबंदीमुळे गावातील वातावरण आता सुधारत आहे. मद्यप्राशन करून गावातील चौकाचौकात धिंगाणा घालणाऱ्यांनी मंदिराची वाट धरल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीalcohol prohibition actदारुबंदी कायदा