लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील एकमेव महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई रूग्णालयात सध्या विविध समस्या असल्याने येथे प्रसूती आणि उपचारासाठी येणाऱ्यांना महिलांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालयात अपुऱ्या खाटा व रिक्त पदांमुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आ.विनोद अग्रवाल यांनी बुधवारी बीजीडब्ल्यू रुग्णालयातील समस्यांचा आढावा घेतलाव त्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले.बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना नेहमीच प्रधान्य देऊन सेवा प्रदान केली पाहिजे.जिल्ह्यातून येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय झाल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी डॉक्टरांना दिला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाबंदी असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय प्रसूतीकरिता बंद आहे. परिणामी त्यांचा भार बाई गंगाबाई रुग्णालयावर आला आहे. लॉकडाउन दरम्यान ५०० हून अधिक प्रसूती बाई गंगाबाई रुग्णालयातील डॉक्टरांना मार्फत करण्यात आल्या आहेत.दररोज जवळपास ३० च्यावर प्रसूती रुग्णालयात केल्या जात आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची पदे सुध्दा रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर तणाव येत आहेत. जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील महिला प्रसूतीकरिता रुग्णालयात मोठ्या संख्येत दाखल झाल्याने येथील रुग्णालयात गर्दी वाढल्याने व्यवस्थेवरील ताण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावर उपाय म्हणून तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात करण्यात आली.आ. अग्रवाल यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी राजा दयानिधि यांच्याशी फोनवरून चर्चा करून जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे प्रसूती व इतर सुविधा पुरविण्यास सांगितले.त्यावर लवकरच निर्णय घेऊन निर्देश केले जातील असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. तसेच आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी चर्चा करून बाई गंगाबाई रुग्णालयातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात अनुभवी डॉक्टरांची नियुक्ती करावी याकरिता चर्चा केली.त्यावर लवकरच पत्रव्यवहार करून अनुभवी व तज्ञ डॉक्टरांची तात्पुरती नियुक्ती केली जाणार असल्याचे माहिती डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितले.
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील समस्या मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST
बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना नेहमीच प्रधान्य देऊन सेवा प्रदान केली पाहिजे.जिल्ह्यातून येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय झाल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी डॉक्टरांना दिला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाबंदी असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय प्रसूतीकरिता बंद आहे.
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील समस्या मार्गी लागणार
ठळक मुद्देडॉक्टरांची रिक्त पदे भरणार : रुग्णालयातील समस्यांचा घेतला आढावा