शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या मार्गी लावणार

By admin | Updated: November 22, 2015 02:06 IST

स्वस्त धान्य दुकानदार हा अतिअल्प कमिशनवर काम करून संसाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना अनेक समस्यांना व प्रसंगी नागरिकांच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

तुमसर : स्वस्त धान्य दुकानदार हा अतिअल्प कमिशनवर काम करून संसाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना अनेक समस्यांना व प्रसंगी नागरिकांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नानाविध समस्यांचा डोंगर त्यांच्यावर कोसळला असून स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे. असे आश्वासन तुमसर विधानसभेचे आमदार चरण वाघमारे यांनी दिले.स्थानिक सिंधी धर्मशाळेत आयोजित स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या दिवाळी मिलन समारंभात ते बोलत होते. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती राजकुमार माटे, संचालक अरविंद कारेमोरे, रामदयाल पारधी, रमेश ईखार, मयुरध्वज गौतम, गुरूदेव भोंडे, शालिकराम गौरकर, घनश्याम बोंदरे, मुरलीधर वासनिक, भाऊराव चौरीवार, गुलराज कुंदवानी, भुपत सार्वे, कुसूम कांबळे, श्यामराव तुरकर, सुनिता कावळे, भाग्यश्री चामट, डॉ. चिंतामन मेश्राम उपस्थित होते.वाघमारे म्हणाले, भविष्यात तुमसर-मोहाडी तसेच वरठी येथील गोडावून म्हणून धान्य दुकानदारांना मिळणारा माल हा वजनानुसारच मिळेल, याकडे कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. गोडावूनमधून मिळणाऱ्या धान्याचे वजन कमी आढळून आल्यास व्यवस्थापकावर कारवाई केली जाणार आहे. वर्तमान स्थितीत दुकानदारांना गोडावून मधून मिळणाऱ्या ५० किलोच्या कटट्यात ३ ते ५ किलोग्रॅम धान्य कमी मिळते. परिणामी दुकानदाराला नाहक ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागते. असेही त्यांनी म्हटले. प्रास्ताविक स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे यांनी केले. त्यांनी दुकानदारांच्या विविध अडचणी अतिथींंना अवगत करून देत शासनाने घरपोच धान्यसाठा ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे दुकानदारांना मिळणारे भाडे किरायाही बंद होणार आहे. एक तर अतिअल्प कमिशन त्यात आता किराया भाडे ही बंद होणार असल्याने दुकानदारांचे कंबरडे मोडल्या गेले आहे. अन्न धान्य पुरवठा मंत्री गिरिश बापट जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताच निवेदन देणार असल्याचे सांगितले. संचालन बाजार समितीचे संचालक अरविंद कारेमोरे यांनी केले तर आभार स्वस्त धान्य दुकानदार तथा भाजपा सचिव प्रमोद घरडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)