शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
3
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
4
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
5
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
6
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
7
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
8
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
9
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
10
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
12
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
13
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
14
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
15
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
16
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
17
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
18
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
19
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
20
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं

वन व कृषी पर्यटन विकासाला प्राधान्य

By admin | Updated: August 3, 2014 00:09 IST

गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव असून कृषी व वनपर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा नियोजनामध्ये प्राप्त निधी

उपमुख्यमंत्र्यांची सूचना : जिल्हा नियोजनाचा निधी वेळेत खर्च करागोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला खूप मोठा वाव असून कृषी व वनपर्यटन विकासाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा नियोजनामध्ये प्राप्त निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अनिल देशमुख, आ.डॉ. खुशाल बोपचे, आ. राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके उपस्थित होते.समृद्ध वनपरंपरा लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव अभयारण्य असून या ठिकाणी दरवर्षी ४३ हजार पर्यटक भेट देतात. या अभयारण्याचा विकास करण्यासाठी व कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असून यावर्षी पर्यटन विकास महामंडळाची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. कृषी पर्यटनाला जिल्हा सहकारी बँकेने निधी देण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. पुणे जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्याने कृषी पर्यटन विकसित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता पाहता जिल्हा नियोजनमध्ये प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सर्वसाधारण, योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व ओटीएसपी या योजनामिळून सन २०१४-१५ साठी १८३ कोटी ८३ लाख ९४ हजार ऐवढी अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यापैकी ९१ कोटी १ लाख २३ हजार निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून तो वेळेत खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले.जिल्ह्यातील खरीपचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यासाठी ४४ हजार ३८० मेट्रीक टन बियाणाचा पुरवठा असून ३४ हजार २२ क्विंटल बियाणे वितरीत करण्यात आले. १० हजार ३५८ क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. तर जिल्ह्यासाठी ४५ हजार १९४ मेट्रिक टन खताचा कोटा असून त्यापैकी २४ हजार २१० मेट्रीक टन खत शिल्लक आहे.जिल्ह्यात ४४ हजार ३७० शेतकरी कृषी कर्ज खातेधारक असून ४२ हजार ११ शेतकऱ्यांना खरीप व रबीचे कृषी कर्ज वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५ हजार ९६९ शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला असून त्यासाठी १ कोटी १७ लाख ८ हजार प्रिमियम भरले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी दिली.माजी मालगुजारी तलाव, तेंदूपत्ता व्यवसाय, औद्योगिक संस्था, महाविद्यालय, सिंचन, पर्यटन, जिल्ह्यातील पावसाची स्थिती, मानव विकास मिशन आदी बाबींचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यात ९ हजार वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले असून पट्टेधारकांना रबी पिक घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलावांचे सक्षमीकरण करुन मत्स्व्यवसायास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. धानउत्पादक शेतकऱ्यांचे धान्य साठविण्यासाठी गोदाम उभारण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी घाटे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)