भाग्यश्री प्रथम : १९ जणांचा सहभागगोरेगाव : गोरेगाव तालुका अंतर्गत अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१५-१६ चे आयोजन परशुराम विद्यालय मोहगाव (बु.) येथे करण्यात आले. यात वर्ग ८ ते १० च्या तालुक्यातील शाळांतील १९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावर्षी प्रकाशाचे उपयोग, शक्यता व आव्हाणे या विषयावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी चार्टस व मॉडेल्सचा आधार घेत सदर विषयावर विवेचन केले. यापूर्वी १० गुणांची लेखी चाचणी घेण्यात आली. यात पी.डी. रहांगडाले विद्यालय गोरेगाव येथील भाग्यश्री चौधरी हिने प्रथम तर किरसान मिशन हायस्कूल गोरेगावची खुशबू हरिणखेडे व रवींद्र विद्यालय चोपाची प्रियंका बिजेवार हिने यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेचे परीक्षण जगत महाविद्यालय गोरेगावचे प्रा. रहांगडाले, प्रा. कटरे व जान्या तिम्या हायस्कूलचे प्राचार्य आकरे यांनी केले.मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी वाय.पी. कावळे याच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी परशुराम विद्यालयाचे मुख्याध्यापक रहांगडाले, अतिथी म्हणून गटसमन्वयक टी.बी. भेंडारकर, विस्तार अधिकारी खोब्रागडे उपस्थित होते. प्रास्ताविक गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ बी.बी. बहेकार यांनी केले. आयोजनाकरिता परशुराम विद्यालय मोहगाव बुज. च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विषयतज्ज्ञ एस.टी. बावनकर, एस.डी. रहांगडाले, एस.बी. ठाकूर, जी.जी. ठाकरे व ओ.एस. ठाकरे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांचे प्रयोग सादर
By admin | Updated: August 9, 2015 01:53 IST