शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गारांसह अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास अचानकच गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.हवामान विभागाने मंगळवारपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. तो अंदाज खरा ठरत सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गाेरेगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या तालुक्यांतही गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले. पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी, तूर व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 वातावरणात वाढला गारवा

- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा वाढल्याने पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर हुडहुडी कायम होती, तर सकाळी स्वेटर आणि सायंकाळी रेनकोट असाच अनुभव जिल्हावासीयांना आला. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्याने अवकाळीचे संकट कायम आहे.

या परिसराला बसला फटका- मंगळवारी दुपारी ४.४५ वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीेट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम, बोदलकसा, बुचाटोला, पिंडकेपार, रूस्तमपूर, आलेझरी, बालापूर, मेंढा, ठानेगाव, खडकी, डोंगरगाव, इंदोरा, निमगाव, मेंदीपूर, भिवापूर, गराडा, चिखली, खमारी, मलपुरी आणि गोरेगाव, गोंदिया या तालुक्यांना बसला.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती