शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:22 IST

गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती.

ठळक मुद्देपिकांना संजीवनी : पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले, पाऊस गाठणार सरासरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारपासून सर्वत्र दमदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने येत्या २४ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे ०.३० मिटरने उघडण्यात आले.त्यामुळे बाघ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाला सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला. तर शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट सुध्दा टळले आहे. मात्र मागील दोन तीन दिवसापासून पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणीच्या कामाला सुध्दा वेग आला होता.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली होती. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली.देवरी, तिरोडा, आमगाव तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्यात जवळपास चार ते पावसाने हजेरी लावल्याने या तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते. काही नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाले होते. अर्जुनी मोरगाव, तिरोडा,सालेकसा,आमगाव आणि देवरी तालुक्यात सुध्दा पावसाची रिपरिप कायम होती.पावसामुळे रोवण्यांना सुध्दा संजीवनी मिळाली असून बळीराजा सुखावला आहे.जिल्ह्यात रेड अर्लटहवामान विभागाने मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अर्लट जाहीर केला आहे.जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे मंगळवारी सायंकाळी ०.३० मीटरने उघडण्यात आले होते. शिवाय यामुळे बाघ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली असून नदीकाठा लगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस