नवेगाव-नागझिरा सज्ज : सर्व प्रवेशव्दारांवर वाहनांची व्यवस्थागोंदिया : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, कोका अभयारण्य तसेच नागझिरा व न्यू नागझिरा अभयारण्य मिळून व्याघ्र प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे वनपर्यटकांचे आकर्षण वाढले असून दिवाळी सुट्यांमध्ये वनभ्रमंती करण्यासाठी आॅनलाईन बुकिंग जोरात सुरू आहे.१ आॅक्टोबरपासून पर्यटकांसाठी येथील सर्व प्रवेशद्वार उघडे करण्यात आले आहे. वनपर्यटकांना पुरेशा सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनही वनविभागही सज्ज आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे जांभळी, खोली, बकी व पितांबरटोला अशी चार प्रवेशद्वार उघडी करण्यात आली आहेत. आॅनलाईन वाहनांच्या बुकींगसाठी जांभळी गेटवर दुपारपूर्वी तीन व दुपारनंतर तीन, खोली येथे दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी तीन, बकी गेटवर दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी तीन, पितांबरटोला गेटवर दुपारपूर्वी पाच व दुपारनंतर सहा वाहनांची सोय करण्यात आली आहे. कोका अभयारण्याच्या चंद्रपूरटोला गेटवर आॅनलाईनसाठी दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी चार वाहन तसेच आॅफलाईनसाठी दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी एकेक वाहनांची सोय करण्यात आली आहे. नागझिरा व न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील पाचही गेट उघडी करण्यात आली आहेत. पिटेझरी येथे आॅनलाईनसाठी २१, आॅफलाईनसाठी सहा, चोरखमारा गेट-१ वर आॅनलाईनसाठी ११ व आॅफलाईनसाठी दोन, मंगेझरी गेटवर आॅनलाईनसाठी सहा व आॅफलाईनसाठी दोन, उमरझरी गेटवर आॅनलाईनसाठी १३ व आॅफलाईनसाठी चार, चोरखमारा गेट-२ वर आॅनलाईनसाठी १० व आॅफलाईनसाठी दोन, तसेच नागझिरा संकूल एफडीसीएममध्ये आॅनलाईनसाठी दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी सहा वाहनांची सोय करण्यात आली आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या जांभळी, खोली, बकी व पितांबरटोला या चारही व कोका अभयारण्याच्या चंद्रपूर गेटवरून वयस्क भारतीयांसाठी प्रत्येकी ३० रूपये तसेच ५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १५ रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. तसेच विदेशी पर्यटकांसाठी प्रत्येकी ६० रूपये व ५ ते १८ वयोगटातील विदेशी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ३० रूपये प्रवेशशुल्क आहे. नागझिरा व न्यू नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी, चोरखमारा गेट-१, मंगेझरी, उमरझरी व चोरखमारा गेट-२ या चारही ठिकाणातून प्रवेशासाठी वयस्क भारतीयांना प्रत्येकी ५० रूपये व ५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी २५ रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच विदेशी वयस्क पर्यटकांकडून प्रत्येकी १०० रूपये व ५ ते १८ वयोगटातील विदेशी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५० रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. पिटेझरी गेटवर २० सिटर सफारी, चोरखमारा गेटवर आठ सिटर सफारी व नवेगावबांध गेटवर ३० सिटर सफारी गाड्यांची सोय करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीच्या सुट्यांत वनभ्रमणाला पसंती
By admin | Updated: October 25, 2014 22:41 IST