शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:21 IST

योग्य उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू झाला. तालुक्यातील ग्राम सोनपुरी येथील ही महिला असून शनिवारी (दि.२९) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे सोनपुरीवासी चांगलेच संतापले होते.

ठळक मुद्देसोनपुरी येथील घटना : गावकऱ्यांनी ठेवला मृतदेह उपकेंद्राच्या दारात

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : योग्य उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू झाला. तालुक्यातील ग्राम सोनपुरी येथील ही महिला असून शनिवारी (दि.२९) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे सोनपुरीवासी चांगलेच संतापले होते.यामुळे त्यांनी रविवारी (दि.३०) महिलेचा मृतदेह गावातील आरोग्य उपकेंद्राच्या दारात ठेवून दोषींवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणामुळे गावातील वातावरण चांगलेच चिघळले होते. अखेर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे प्रकरण शांत झाले.गीताबाई महारू पंधरे (३०,रा.सोनपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. सविस्तर असे की, गीताबाई यांना शनिवारी (दि.२९) पहाटे प्रसुती वेदना सुरू झाल्याने घरच्यांनी त्यांना सकाळी ६ वाजतादरम्यान गावातील आरोग्य उपकेंद्रात भर्ती केले. मात्र उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी खोब्रागडे गैरहजर असतानाही आरोग्य सेविता माधुरी गजभिये यांनी गीताबाईला थांबवून ठेवले व दुपारी ३ वाजता सालेकसा ग्रामीण रूग्णालयात रेफर केले. यावर घरच्यांनी त्यांना सालेकसा येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना गोंदियाला रेफर केले.दरम्यान सायंकाळी सुमारे ४ वाजतादरम्यान गीताबाईंना घेऊन घरचे लोक गोंदियासाठी निघाले. मात्र सुमारे आठ-दहा तासांचा कालावधी व्यर्थ गेल्याने वाटेतच गीताबाईंची प्रकृती गंभीर झाली व अदासी व गावाजवळ त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर सोबतच त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. गोंदियातील रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी गीताबाईंना मृत घोषीत केले. तसेच रात्री मृतदेह तेथेच ठेवला व रविवारी (दि.३०) सकाळी उत्तरीय तपासणी करून घरच्यांना दिला.मात्र या घटनेमुळे घरचे व गावकरी चांगलेच खवळले होते व त्यांनी सकाळी ११ वाजतादरम्यान मृतदेह गावातील आरोग्य उपकेंद्राच्या दारात ठेवून दोषींवर कारवाई होत पर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची मागणी केली. विशेष म्हणजे, याप्रसंगी उपकेंद्रात कुणीही नसल्याने गावकरी आणखीच खवळले होते.याबाबत माहिती मिळताच सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजकुमार डुणगे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना बोलावून घेतले. त्यानुसार, तालुका आरोग्य अधिकारी गगन गुप्ता, वैद्यकीय अधिकारी राजू रघटाटे व स्थानिक डॉक्टर अमर खोब्रागडे घटनास्थळी आले.यावेळी सरपंच संगीता कुराहे यांनी अरोग्य सेविका माधुरी गजभिये व ममता खोब्रागडे योग्यरित्या आरोग्य सेवा देत नसल्याचे सांगीतले.तसेच उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे यांना बनगाव आरोग्य केंद्राची जबाबदारी दिली असल्याने ते एक-दोन दिवसच येत असल्याचे सांगत येथील व्यवस्थेत सुधारणा करा किंवा उपकेंद्र बंद करा अशी मागणी सरपंच कुराहे व गावकऱ्यांनी केली.लेखी आश्वासनानंतर प्रकरण थंडावलेगावातील घटनेमुळे संतापलेल्या गावकºयांना पोलिसांनी नियंत्रणात आणले अन्यथा कोणतीही अप्रिय घटना घडली असती. दोषींवर कारवाई करा अशी मागणी गावकरी करू लागले होते. मात्र त्यातही लेखी आश्वासन द्या तेव्हाच मृतदेह उचलू या भूमिकेवर गावकरी अडून असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी गुप्ता यांनी दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सुमारे ४.३० वाजतादरम्यान गावकºयांनी मृतदेह उचलला.या उपकेंद्रात दोन आरोग्य सेविका असून एक नेहमी बाहेरून ये-जा करते. तर दुसरी वेळेवर उपचार देण्यात तयार नसले. तसेच डॉक्टर नियमित राहत नसल्याने योग्य उपचार मिळत नाही. या समस्या आरोग्य विभागाने तातडीने दूर कराव्या.- संगीता कुराहे, सरपंच, सोनपुरीडॉ. खोब्रागडे यांना आजपासून सोनपुरी उपकेंद्रावर सातही दिवस नियमित करण्यात येत आहे. तसेच दोषी आढळल्यास आरोग्य सेविकेवर नियमानुसार कारवाई केली जाईल.- गगन गुप्ता तालुका वैद्यकीय अधिकारी, सालेकसा.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू