लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. तिरोडा तालुक्यात तिरोडा मंडळ येथे ७९ टक्के, परसवाडा ९२ टक्के, ठाणेगाव मंडळात ३६, मुंडीकोटा ३४, वडेगाव ८ टक्के रोवणी झाली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांचे धान पीक धोक्यात आले असून दुष्काळाची स्थिती नाकारता येत नाही, असे आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले.सदर परिस्थिती महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असून पूर्वतयारी म्हणून प्रत्येक गावात पर्जन्याचे प्रमाण, पाणी टंचाई व चारा टंचाई यांचा तालुका अधिकाºयांनी अहवाल तयार करावा. तसेच महाराष्टÑ शासनाने कर्ज माफीसाठी आॅनलाईन लिंक दिली आहे. शेतकºयांना कर्ज माफीसाठी अर्ज करण्याचा सुविधेकरिता प्रत्येक गावामध्ये आपले सरकार सीएससी केंद्र सुरू करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना कर्जमाफीचे आवेदन करणे सोपे होईल.पीक विम्याच्या आॅनलाईन अर्जावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. तसेच शासनाच्या योजनांची माहिती कळण्यासाठी पुढेही सीएससी केंद्र सुरू ठेवण्यात यावे. त्याप्रमाणे धडक सिंचन विहीर योजनेकरिता प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांचे त्वरित नियोजन करुन मंजुरी करवून घ्यावे. एमआरईजीएसची बहुतांश गावांमध्ये ६० टक्के कुशल कामे झालेली आहेत. अशा कामांना पूर्णत्वास नेण्याकरिता प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. तसेच तालुक्यात झुडपी जंगल प्रकरण निकाली लावून पट्टे वाटप करण्यात यावे, असे आदेश तालुकास्तरीय आढवा बैठकीत आमदार रहांगडाले यांनी दिले.सभेला उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाळे, तहसीलदार संजय रामटेके, नायब तहसीलदार वाकचौरे, गटविकास अधिकारी ईमानदार, न.प. अध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, कृउबास सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, लपा विभाग उपअभियंता अनंत जगताप, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, माजी उपसभापती वसंत भगत, संचालक तिरुपती राणे, चतुर्भूज बिसेन उपस्थित होते.
दुष्काळसदृश परिस्थितीचे पूर्वनियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:32 IST
पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. तिरोडा तालुक्यात तिरोडा मंडळ येथे ७९ टक्के, परसवाडा ९२ टक्के, ठाणेगाव मंडळात ३६, मुंडीकोटा ३४, वडेगाव ८ टक्के रोवणी झाली आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीचे पूर्वनियोजन करा
ठळक मुद्देविजय रहांगडाले : तालुकास्तरीय आढावा बैठक