शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जागेसाठी सभापती, संचालकांचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:04 IST

सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड व गोदामासाठी १.८२ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी मागील दोन वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे केली.

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समिती : प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड व गोदामासाठी १.८२ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी मागील दोन वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे केली. मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी न लागल्याने सभापती, उपसभापती व संचालकांनी गुरूवार (दि.२) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील गट क्रमांक ११३५ आराजी ५४.०२ हे.आर.पैकी ०.८० हेक्टर आर शासकीय जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत आणि गोदाम बांधकामासाठी मंजूर करण्यात यावी. या मागणीचा प्रस्ताव अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी, सहायक संचालक नगर रचना, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. याला दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र प्रशासनाने यावर अद्यापही तोडगा काढला नाही. त्यामुळे पुन्हा हाच प्रस्ताव नागपूर विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. मात्र त्यांनी सुध्दा या प्रस्तावावर काहीच कारवाई केली नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती व गोदामासाठी जागा उपलब्ध नसल्याने बाजार समितीत येणार शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळेच बरेचदा शेतकºयांचे नुकसान होत आहे. आधीच जिल्ह्यातील मागील तीन चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे.त्यातच प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे.त्यामुळे शासनाने याची दखल घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी सभापती व संचालकांनी गुरूवारी (दि.२) सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. सभापती अविनाश काशीवार, आनंदकुमार अग्रवाल, हिरालाल चव्हाण, मिताराम देशमुख, दिलीप गभणे, देवचंद तरोणे, रोशन बडोले, सुखदेव कोरे, मंगेश नागपुरे, वसंत गहाणे, रमेश अग्रवाल, देवेंद्र तुकर आदी आमरण उपोषणाला बसले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डStrikeसंप