शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

तालुक्यात राजकीय वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:11 IST

गावपातळीवर ग्रामपंचायतला फार महत्व आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतला विविध शिर्षकाखाली थेट निधी येतो. पंचायत राजमध्ये ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आर्थिक सक्षम स्थितीत आहेत.

ठळक मुद्दे४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका : २५ ग्रामपंचायतींवर येणार महिला राज

अमरचंद ठवरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : गावपातळीवर ग्रामपंचायतला फार महत्व आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतला विविध शिर्षकाखाली थेट निधी येतो. पंचायत राजमध्ये ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आर्थिक सक्षम स्थितीत आहेत. गावात येणारा निधी विकास कामावर कसा खर्च करायचा, हे त्या ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधीवर अवलंबून असते. ग्राम पंचायतची कमान ताब्यात ठेवण्यासाठी गावा-गावात कमालीची चढाओढ निर्माण झालेली असून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ४० ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या असून १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. शुक्रवारपासून (दि.२२) नामांकन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऐन शेतीच्या हंगामात पावसाच्या मोसमात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामाने तालुक्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापलेले आहे. गावागावात सरपंच पदासाठी डावपेच आखले जात असून कोणत्याही गटाने अद्यापही आपली रणनिती उघड केलेली दिसत नाही. गावच्या प्रत्येक मतदारांशी निगडीत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी संबंधाने गावखेड्यात राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसत आहे. आवश्यक कागपत्रांची जुळवा-जुळव करण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेची तहसील कार्यालयावर गर्दी वाढलेली आहे. एकंदरित ग्रामपंचायत निवडणुकीबाबत ग्रामस्थांमध्ये कमालीचा उत्साह वाढलेला दिसत आहे.राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतच्या निवडणुका येत्या १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाने घेतल्या जाणार आहेत. शुक्रवारपासून (दि.२२) नामांकन अर्ज स्वीकारले जाणार आहे. यावेळी पहिल्या प्रथम थेट संपूर्ण गावामधून सरपंचाची निवडणूक होणार असल्याने मतदारांना चांगले दिवस येणार असल्याचे बोलल्या जाते.तालुक्यातील इटखेडा, कान्होली, येरंडी (दर्रे), रामपुरी, कोहलगाव, भिवखिडकी, ताडगाव, मुंगली, नवनीतपूर, बोदरा (दे.), दाभना, अरतोंडी, निमगाव, झरपडा, धाबेटेकडी (आदर्श), बोळदे/करड, सुकळी, मोरगाव, सिरोली, विहिरगाव (बर्ड्या), तुकुमनारायण, कोरंभी, खामखुर्रा, वडेगाव (बंध्या), महालगाव, बुधेवाडा, वडेगाव (रेल्वे), रामनगर, पिंपळगाव, चापटी, खांबी, येरंडी(देवलगाव), गुढरी, अरुणनगर, गौरनगर, सोमलपूर, चान्ना (बाक्टी), बाक्टी (चान्ना), गोठणगाव, नवेगावबांध या ग्रामपंचायतमध्ये निवडणूक ज्वर कमालीचा तापू लागला आहे. ४० ग्रामपंचायतमधील १२३ प्रभागातून ३४० ग्रामपंचायत सदस्य १२३ मतदान केंद्रामधून निवडले जाणार आहेत. यात अनु.जाती प्रवर्गातून ७०, अनु. जमाती मधून ७२, नागरिकांना मागास प्रवर्गामधून ८४, सर्वसाधारण गटामधून ११४ असे ३४० ग्रामपंचायत सदस्य निवडण्यात येणार आहे.तालुक्यातील ४० ग्राम पंचायतीमध्ये ग्रामपंचायतनिहाय १२३ मतदान केंद्रामधून २९ हजार १३२ पुरुष तर २७ हजार ९०१ महिला असे ५७ हजार ३३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डी.सी. बोंबर्डे यांनी निवडणूक प्रक्रिया गतिमान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशा १६ अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.ग्रामापंचायत निवडणूक रणसंग्रामाने तालुक्यातील वातावरण तापू लागले आहे. राजकीय चिन्हावर निवडणूक होत नसली तरी सर्वच राजकीय पक्षांनी गावपातळीवरील ग्रामपंचायतच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. आरक्षण जागेवरील उमेदवार निवडण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होताना दिसत आहे.सरपंच पदाचे ग्रामपंचायतनिहाय आरक्षणइटखेडा- अनु.जमाती, कान्होली सर्वसाधारण, येरंडी (दरे) नामाप्र स्त्री, रामपुरी सर्वसाधारण स्त्री, कोहलगाव सर्वसाधारण स्त्री, भिवखिडकी अनु. जमाती स्त्री, ताडगाव अनु. जाती, मुंगली अनु. जमाती स्त्री, नवनीतपूर सर्वसाधारण स्त्री, बोदरा (दे.) अनु. जमाती, दाभना नामाप्र, अरतोंडी सर्वसाधारण स्त्री, निमगाव सर्वसाधारण, झरपडा नामाप्र स्त्री, धाबेटेकडी(आदर्श) नामाप्र, बोळदे/करड नामाप्र स्त्री, सुकडी नामाप्र, मोरगाव अनु. जमाती स्त्री, सिरोली अनु. जमाती स्त्री, विहीरगाव/बर्ड्या नामाप्र, तुकमनारायण नामाप्र स्त्री, कोरंभी सर्वसाधारण स्त्री, खामखुर्रा अनु. जाती, वडेगाव/बंध्या सर्वसाधारण स्त्री, महालगाव नामाप्र, बुधेवाडा सर्वसाधारण स्त्री, वडेगाव/रेल्वे नामाप्र स्त्री, रामनगर सर्वसाधारण स्त्री, पिंपळगाव अनु. जाती स्त्री, चापटी अनु. जमाती स्त्री, खांबी सर्वसाधारण, येरंडी/देवलगाव अनु. जाती स्त्री, गुढरी नामाप्र स्त्री, अरुणनगर नामाप्र स्त्री, गौरनगर सर्वसाधारण स्त्री, सोमलपूर सर्वसाधारण, चान्ना/बाक्टी अनु. जमाती स्त्री, बाक्टी/चान्ना अनु. जमाती, गोठणगाव नामाप्र स्त्री, नवेगावबांध अनु. जाती.सरपंचाची निवड थेट जनतेमधूनयावेळी पहिल्या प्रथमच गावातील संपूर्ण मतदार जनतेमधून सरपंच निवडणार आहेत. सरपंच पदाच्या उमेदवारास अख्ख्या गावातील मतदारास आपली भूमिका पटवून द्यावी लागणार आहे. गावातून निवडणारा सरपंच हा पॉवरफुल राहील. समस्त मतदारांशी संपर्क ठेवूनच गावाचा सरताज बनण्याची किमया सरपंच पदाच्या उमेदवारास करावी लागणार आहे. तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण दोन वर्षापूर्वीच काढण्यात आले होते. तेच आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.२५ महिला सांभाळणार गावाची कमानआज विविध क्षेत्रामध्ये महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करताना दिसून येतात. काही क्षेत्रामध्ये महिला पुढेही आल्याचे दिसून येत आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून सार्वजनिक पंचायतराजमध्ये ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. राजकारणात महिला मागे नाही, याचा अनुभव महिलांच्या कार्यकर्तृत्वावरुन दिसून येत आहे. महिला आरक्षणातून पतीराज बाद व्हावा हीच अपेक्षा मतदारांची राहणार आहे. ४० ग्रामपंचायतमधून तालुक्यात २५ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची कमान महिलांच्या हातामध्ये राहणार आहे. थेट मतदार जनतेमधून निवडून २५ महिला ग्रामपंचायतची कमान सांभाळण्यासाठी निवडणूक रणसंग्रामात कमालीच्या सहभागी झालेल्या दिसत आहे. पिंपळगाव, येरंडी/देवलगाव, भिवखिडकी, मुंगली, मोरगाव, सिरोली, चापटी, चान्ना/बाक्टी, रामपुरी, कोहलगाव, नवनितपूर, अरततोंडी, कोरंभी, वडेगाव/बंध्या, बुधेवाडा, रामनगर, गौरगनर, येरंडी/दर्रे, झरपडा, बोळदे/करड, तुकुमनारायण, वडेगाव/रेल्वे, गुढरी, अरुणनगर, गोठणगाव या गावात महिला सरपंच राहणार आहेत. यामध्ये अनु.जाती प्रवर्गातील २, अनु. जमातीच्या ६, नामाप्रच्या ८, सर्वसाधारण ९ असा आरक्षणनिहाय सहभाग राहणार आहे.